Child Marriage: शाळेत प्रेम, मंदिरात लग्न अन् पुण्यात संसार; मुलीने १४ व्या वर्षी दिला बाळाला जन्म, बालविवाहाची हादरवणारी घटना

एका १४ वर्षीय मुलीने जिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मुलीच्या अल्पवयीन पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
teenage pregnancy
teenage pregnancy file photo
Published on
Updated on

Child Marriage

पिथोरागढ: उत्तराखंडमधील मुनस्यारी येथे एका १४ वर्षीय मुलीने सरकारी जिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मुलीच्या अल्पवयीन पतीवर 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही अल्पवयीन असून त्यांनी गेल्या वर्षी एका मंदिरात विवाह केला होता आणि पुण्यात राहत होते.

teenage pregnancy
Child marriage Amravati | अत्याचारातून गर्भवती: अल्पवयीन मुलीचे लावून दिले लग्न; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

शाळेतलं प्रेम आणि बालविवाहानंतर पुण्यात संसार

पिथोरागढ जिल्ह्यातील मुनस्यारी येथील एका शाळेत शिकत असताना या दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी गुपचूप एका मंदिरात लग्न केले. लग्नानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहायला आले. मात्र मुलगी गरोदर राहिल्यानंतर पुन्हा गावी गेली. मुलगा पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला असल्याने तो गावी परतलेला नाही.

दरम्यान, सासरच्या मंडळींनी पीडित मुलीला प्रसूती कळा सुरू झाल्यावर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलीचे वय अतिशय कमी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई सुरू केली.

पीडित मुलीचे वडील पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर तिची आई कुटुंबापासून विभक्त राहते. पीडित मुलगी मुनस्यारीत आपल्या सावत्र आईसोबत राहत होती. लग्नानंतर ती पुण्याला गेली, मात्र प्रसूतीसाठी पुन्हा उत्तराखंडमध्ये परतली होती.

"याप्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलावर पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे."

बबिता टम्टा, उपनिरीक्षक

"आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, मुलीच्या आणि नवजात अर्भकाच्या आरोग्याची आणि देखभालीची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे,"

लक्ष्मण सिंह खाती, अध्यक्ष, बालकल्याण समिती

teenage pregnancy
Child abuse case : कल्याणमध्ये क्रिकेट कोचकडून अल्पवयीन मुलीचे शोषण; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news