Child abuse case : कल्याणमध्ये क्रिकेट कोचकडून अल्पवयीन मुलीचे शोषण; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

क्रिकेट कोचच्या विकृत कृत्याचा पर्दाफाश
Child assault case
Child assault casePudhari
Published on
Updated on

टिटवाळा : कल्याण तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात एका क्रिकेट कोचकडून शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी संबंधित कोचविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल साळवे असे आरोपीचे नाव असून तो परिसरातील मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होता. त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलींशी तो गैरवर्तन करत असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. मात्र, शेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीबरोबर आरोपी नराधम हा अश्लील कृत्य करत असताना त्या पिडीत मुलीच्या नातेवाईकाने प्रत्यक्ष प्रकार पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तत्काळ कल्याण तालुका पोलीस ठाणे टिटवाळा येथे तक्रार दाखल केली.

Child assault case
Jat Panchayat | जात पंचायतींचे बदलते स्वरूप...

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल चोरगे पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणाची संवेदनशीलतेने हाताळणी करत कठोर कारवाईची हमी दिली असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Child assault case
Missing Minor Girls: अल्पवयीन मुली जातात तरी कुठे? हरवलेल्या मुलींच्या वाढत्या घटनांमागील गंभीर प्रश्न

पालकांनो सर्तक राहा !

1)या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मुलांना कोणत्याही प्रशिक्षणासाठी पाठवताना त्या ठिकाणाची खातरजमा करणे, प्रशिक्षकांची पार्श्वभूमी तपासणे, तसेच मुलांशी नियमित संवाद ठेवणे अत्यावश्यक आहे. अनेक वेळा मुलं भीतीपोटी किंवा लाजेखातर अशा घटनांबाबत बोलत नाहीत, त्यामुळे पालकांनी त्यांच्या वागण्यात होणारे बदल ओळखून सतर्क राहणे गरजेचे आहे.

2) लहान मुलांना ‌‘चांगला स्पर्शवाईट स्पर्श‌’ याबाबत योग्य मार्गदर्शन देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ विश्वासू व्यक्तीला सांगण्याची सवय लावणे ही काळाची गरज बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या विषयाकडे गांभीर्याने पाहत मुलांच्या सुरक्षिततेसाठी सजग राहणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news