

अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून, अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज (दि. १२ जुलै) शनिवारी केले.
अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर तीन सेकंदातच एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानांच्या दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा खंडित झाला होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हा तपास 'आव्हानात्मक' असल्याचे सांगतनागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केंद्रीय मंत्र्यांनी पारदर्शक, परिपक्व आणि व्यावसायिक पद्धतीने तपास केल्याबद्दल विमान अपघात अन्वेषण ब्युरोचे (AAIB) कौतुक केले.
माध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले की, "नागरी विमान वाहतूक मंत्रालय या अहवालाचे सखोल विश्लेषण करत आहे. आपण कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण एका ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकू." दरम्यान, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सांगितले की, वैमानिकांमधील संवाद अत्यंत संक्षिप्त असल्याने केवळ त्यांच्या बोलण्याच्या आधारावर कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.
तथापि, अहवालात कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेल्या वैमानिकांमधील संभाषणाचा उल्लेख आहे. यामध्ये एक वैमानिक दुसऱ्याला 'इंधन पुरवठा का बंद केला?' असे विचारताना ऐकू येत आहे. त्यावर दुसऱ्या वैमानिकाने 'मी नाही केले' असे उत्तर दिले.या विमानाचे नेतृत्व ५६ वर्षीय कॅप्टन सुमीत सभरवाल करत होते, ज्यांना १५,६३८ तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यांचे सहवैमानिक ३२ वर्षीय क्लाइव्ह कुंदर होते, ज्यांना एकूण ३,४०३ तासांचा अनुभव होता.
विमानाला टेक-ऑफसाठी (उड्डाणासाठी) परवानगी देण्यात आली.१:३७:३७: विमानाने धावपट्टीवरून वेग घेण्यास सुरुवात केली (टेक-ऑफ रोल). १:३८:३९: वाजता विमानाने जमिनीवरून हवेत झेप घेतली (लिफ्ट-ऑफ). तपास अधिकाऱ्यांच्या मते, एअर/ग्राउंड सेन्सर्स 'एअर मोड'मध्ये गेल्याने टेक-ऑफ झाल्याचे दर्शवते. विमानाने १८० नॉट्सचा कमाल वेग गाठला. यानंतर तत्काळ विमानाचे इंजिन १ आणि इंजिन २ चे इंधन कटऑफ स्विच एका सेकंदाच्या अंतराने 'RUN' वरून 'CUTOFF' स्थितीत गेले. अहवालानुसार, जिनांना होणारा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे, इंजिन N1 आणि N2 ची गती टेक-ऑफच्या मूल्यांवरून कमी होऊ लागली. याचवेळी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये वैमानिकांमधील गोंधळ स्पष्टपणे ऐकू येतो. एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारले, "तुम्ही स्विच कटऑफ का केले?" यावर दुसऱ्या वैमानिकाने उत्तर दिले की, "मी केले नाही."