'या' राज्यात दुधाचे दर १ एप्रिलपासून वाढणार
पुढारी ऑनलाईन डेस्क: Karnataka Milk Price | पुढील महिन्यात १ एप्रिलपासून कर्नाटकातील दुधाच्या किंमतीत वाढ होणार आहे. प्रतिलीटर ४ रूपयांची वाढ होणार असल्याची घोषणा कर्नाटक राज्य सरकारने केली आहे. या संदर्भातील माहिती कर्नाटचे सहकारमंत्री के.एन.राजन्ना यांनी दिल्याचे वृत्त 'PTI'ने दिले आहे.
यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दूध दरवाढीला दुजोरा देण्याचे टाळले होते. कारण आज २७ मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान कर्नाटक मिल्क फेडरेशनने (केएमएफ) वाढता उत्पादन खर्च, वाढलेला वेतन आणि वाढता वाहतूक खर्च या कारणांमुळे प्रति लिटर ५ रुपये वाढ प्रस्तावित केली होती. तथापि, राज्य सरकारने अखेर प्रतिलीटर दूधामागे ४ रुपयांची वाढ मंजूर केली आहे.
दूध उत्पादन आणि प्रक्रियेचा खर्चलक्षात दूध दरवाढ
कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री के. वेंकटेश म्हणाले, "मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये दूध उत्पादन आणि प्रक्रियेचा खर्च लक्षात घेता राज्यात दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नंदिनी दूध आणि दहीच्या विक्री किमतीत प्रति लिटर/किलो ४ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किंमत सुधारित रक्कम थेट राज्यातील दूध उत्पादकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी पावले उचलली जातील. याव्यतिरिक्त, २६ जून २०२४ पासून नंदिनी दुधाच्या प्रत्येक १ लिटरसाठी २ रुपयांची किंमत वाढ मागे घेण्याचे आणि पूर्वीप्रमाणेच ५०० मिली आणि १ लिटर पॅकेजमध्ये ४ रुपयांची सध्याची किंमत सुधारित करून विक्रीसाठी पावले उचलण्याचे सांगण्यात आले आहे."

