Viral Post | मेक्सिकोच्या न्यूरोसर्जनचं नाव 'रवींद्रनाथ टागोर' यांच्यावरून का ठेवलं? भारतीयाची पोस्ट व्हायरल

mexican neurosurgeon rabindranath | न्यूरोसर्जन रवींद्रनाथ यांच्‍या नावा मागील गोष्‍ट केली शेअर
Viral Post | मेक्सिकोच्या न्यूरोसर्जनचं नाव 'रवींद्रनाथ टागोर' यांच्यावरून का ठेवलं? भारतीयाची पोस्ट व्हायरल
Published on
Updated on

mexican neurosurgeon rabindranath

नवी दिल्‍ली: मागील दशकापासून आपल्‍याकडे मुलांची नावे अहान, अनाया, शनाया किंवा झोई अशी आधुनिक नावे म्‍हणून ठेवण्‍याची फॅशनच झाली आहे. एकीकडे भारतीय मुलांची नावे ठेवताना पाश्‍चातीकरणा बळी पडतताना दिसत असताना मेक्‍सिकोमध्‍ये मेक्सिकोमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलाचे नाव 'रवींद्रनाथ' ठेवल्याचा एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. यासंसर्भात डिजिटल क्रिकेएर परितोष पांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

मेक्सिकन डॉक्टरांचे नाव ऐकले आणि आश्‍चर्याचा धक्‍काच बसला...

परितोष पांडे हे एका आंतरराष्ट्रीय परिषदेला गेले होते. तिथे अचानक त्यांची भेट एका मेक्सिकन न्यूरोसर्जनशी (मेंदूचे डॉक्टर) झाली.परितोष यांनी डॉक्टरांचे नाव ऐकले, तेव्हा त्यांना आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. त्या मेक्सिकन डॉक्टरचे नाव 'रवींद्रनाथ' होते. मेक्‍सिकन व्‍यक्‍तीचे नाव 'रवींद्रनाथ' ऐकून परितोष यांना मनस्‍वी आनंद झाला. सोबतच त्यांचे काही पश्‍चिम बंगालबरोबर कनेक्शन आहे का, याबद्दल उत्सुकताही निर्माण झाली होती.

Viral Post | मेक्सिकोच्या न्यूरोसर्जनचं नाव 'रवींद्रनाथ टागोर' यांच्यावरून का ठेवलं? भारतीयाची पोस्ट व्हायरल
Viral Post : "मला तुझ्‍या JEE रँकची पर्वा नाही.." : IIT दिल्लीच्या पदवीधराला नोकरी नाकारली!

'रवींद्रनाथ' नावामागचे गुपित

परितोष यांनी संबंधित डॉक्टरांना नावाविषयी विचारले. डॉक्‍टरांनी सांगितले की, माझ्‍या वडिलांना भारताचे महान लेखक आणि थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य प्रचंड आवडायचे. ते टागोरांचे खूप मोठे चाहते होते. याच प्रेमापोटी त्यांनी माझं नाव 'रवींद्रनाथ' ठेवले होते.

Viral Post | मेक्सिकोच्या न्यूरोसर्जनचं नाव 'रवींद्रनाथ टागोर' यांच्यावरून का ठेवलं? भारतीयाची पोस्ट व्हायरल
Viral post : बांधकामांच्या ठिकाणी दिसणारी ती 'गूढ' महिला कोण? सोशल मीडियाने सोडवले कर्नाटकातील 'कोडे'!

पांडे यांनी टागोरांच्‍या प्रसिद्ध पत्रव्यवहाराची करुन दिली आठवण

या भेटीदरम्यान परितोष पांडे यांनी त्या मेक्सिकन डॉक्टरला रवींद्रनाथ टागोरांच्या दक्षिण अमेरिका दौऱ्याची आणि 'व्हिक्टोरिया ओकॅम्पो' यांच्यासोबतच्या त्यांच्या प्रसिद्ध पत्रव्यवहाराची आठवण करून दिली. हे ऐकून तो मेक्सिकन डॉक्टरही भारावून गेले.

Viral Post | मेक्सिकोच्या न्यूरोसर्जनचं नाव 'रवींद्रनाथ टागोर' यांच्यावरून का ठेवलं? भारतीयाची पोस्ट व्हायरल
viral video : "माझ्या बहिणीला भूक लागली असती तर...." : एका भावाच्या कृतीने इंटरनेटवर मारली बाजी 

हे खरोखरच अद्भूत....

आजच्या काळात जिथे भारतातील अनेक पालकांचा ओढा अहान, अनाया, शनाया किंवा झोई अशा नावांकडे आहे, तिथे मेक्सिकोमधील एका व्यक्तीने आपल्या मुलाचे नाव 'कविगुरु' यांच्या नावावर ठेवावे, हे खरोखरच अद्भूत आहे." असे परितोष पांडे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news