Meerut Blue Drum Case : मुस्कान आणि साहिलला फाशीची शिक्षा सुनावण्‍यापूर्वी न्यायाधीशांनी दिला महाभारत आणि गीतेचा संदर्भ

दोन्‍ही आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी
Meerut Blue Drum Case
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari
Published on: 
Updated on: 

Meerut blue drum case : मेरठमधील गाजलेल्या 'ब्लू ड्रम' हत्या प्रकरणात न्यायालयाने आज (दि. १४) आपला निकाल दिला. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कलम ३०२ अन्वये ५०,००० रुपये आणि कलम २९८-ए अन्वये २०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीशांनी महाभारत आणि गीतेचा संदर्भ दिला.

'चुकीची कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करणे हा देखील धर्मच'

बुधवारी, जेव्हा संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले होते, तेव्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी महाभारत ग्रंथाचा दाखला देत निकाल सुनावला. सौरभ राजपूतचे वकील कृष्ण कुमार दुबे यांनी सांगितले की, सुनावणीदरम्यान न्यायालयाने महाभारत आणि गीतेचा उल्लेख केला. "चुकीची कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करणे हा देखील धर्मच आहे," असे नमूद करत न्यायालयाने आपले कर्तव्य पार पाडल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी असलेल्या मुस्कान आणि साहिल यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली; मात्र, दोघांनीही तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने निकाल जाहीर केला.

Meerut Blue Drum Case
Shraddha Dubey : फरार मॉडेल श्रद्धा दुबेचे एक-दोन नव्हे, अनेक धक्कादायक गुन्हे आले समोर; २५ हजारांचे बक्षीस जाहीर!

मुस्कान आणि साहिलच्या वकिलांनी कोणता युक्तिवाद केले?

वकिलांनी या निकालाचे वर्णन 'ऐतिहासिक' असे केले आणि सांगितले की, यामुळे समाजात असा संदेश जाईल की लोभापायी कोणीही असा भयंकर गुन्हा करू नये. त्यांनी बचावासाठी काही मुद्दे मांडले होते, प्रत्यक्ष हत्येचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसणे आणि मुस्कानला दोन मुली असणे. मात्र, न्यायालयाने हे युक्तिवाद फेटाळून लावले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

Meerut Blue Drum Case
Air India Hijack Alert : 'हायजॅक' अलर्टनंतर एअर इंडियाच्या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

न्यायालयात 'भारत माता की जय'च्या घोषणा

जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान मृत सौरभ राजपूतचे कुटुंबीय उपस्थित होते. निकालानंतर न्यायालयात 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या. निकालानंतर भावूक झालेल्या सौरभ राजपूतच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विवाहित जोडप्यांना आवाहन करताना त्या म्हणाल्या की, "तुम्हाला एकत्र राहायचे नसेल, तर वेगळे व्हा; पण कोणाच्या तरी मुलाचा जीव घेऊ नका. आमच्यासाठी आमचा मुलगा कुठेही गेलेला नाही; तो आमच्या आठवणींत जिवंत आहे."

संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे 'ब्लू ड्रम मर्डर केस'

३ मार्च २०२५ रोजी मेरठच्या ब्रह्मपुरी भागात मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सौरभ राजपूतची हत्या करण्याचा कट मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांनी रचला. मुस्कान आणि साहिल यांनी ज्या क्रूरतेने हा गुन्हा केला, त्याचे सत्य समोर आल्यावर संपूर्ण देश हादरून गेला. आपल्या प्रेमसंबंधांमुळे प्रेरित होऊन, मुस्कान आणि साहिल यांनी सौरभचा काटा काढण्याचा कट रचला. सौरभ घरी परतल्यावर, मुस्कानने त्याच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. त्यानंतर साहिलने त्याच्या छातीत वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर, त्या दोघांनी मृतदेहाचे तुकडे केले, ते तुकडे एका निळ्या ड्रममध्ये भरले आणि त्यात सिमेंटचे मिश्रण ओतले. ड्रम खूप जड असल्याने तो हलवणे शक्य झाले नाही; त्यामुळे त्यांनी तो घरातच तसाच ठेवला आणि ते हिमाचलच्या सहलीला निघून गेले.

१,००० पानांचे दोषारोपपत्र, १३ महिने सुनावणी

ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. १८ मार्च रोजी २०२५ रोजी दोघांना अटक करण्यात आली. तेव्हापासून ते कोठडीत आहेत. तुरुंगात असताना मुस्कानने एका मुलीला जन्म दिला. या प्रकरणाची सुनावणी जुलै २०२५ मध्ये मेरठच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू झाली. तपासानंतर पोलिसांनी १,००० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. १३ महिन्यांत झालेल्या १२६ सुनावण्यांनंतर न्यायालयाने अखेर आपला निकाल दिला. दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news