BSE च्या MCAP ने हाँगकाँगला टाकले मागे! भारतीय शेअर बाजाराची चौथ्या स्थानी झेप

BSE च्या MCAP ने हाँगकाँगला टाकले मागे! भारतीय शेअर बाजाराची चौथ्या स्थानी झेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : BSE MCAP : भारतीय शेअर बाजारात तेजी आली आहे. बीएसईच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे एमकॅप पुन्हा हाँगकाँगच्या पुढे गेले आहे. यासह, भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनला आहे.

ब्लूमबर्ग डेटानुसार, शुक्रवारी (दि. 14) भारतीय एक्सचेंजेसवर स्टॉकचे मूल्य 5.18 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. तर, हाँगकाँग मार्केटचा हा आकडा 5.17 ट्रिलियन डॉलर होता. यासह भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनला आहे. अमेरिका 56.49 ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून चीन (8.84 ट्रिलियन डॉलर) दुसऱ्या स्थानावर आहे. 6.30 ट्रिलियन डॉलर्ससह जपान तिसऱ्या स्थानावर आहे.

यापूर्वीही हाँगकाँगला मागे टाकले होते

या वर्षी 23 जानेवारी रोजी बीएसईने हाँगकाँगला मागे टाकले होते, परंतु नंतर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 12 टक्क्यांहून अधिक वाढला. त्यानंतर ते पुन्हा चौथ्या स्थानावर आले. जानेवारीपासून सुमारे 20 टक्क्यांच्या वाढीसह ते तेजीच्या मार्केटमध्ये दाखल झाले.

निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर परिणाम

भारतात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 4 जून रोजी, बाजारात 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. पण त्यानंतर बाजारात सातत्याने वाढ होऊन विक्रमी उच्चांक गाठले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news