Mathura Viral Wedding | दाजींनी केले मेव्हण्यांना खुश! लग्नात दोघांच्या गळ्यात घातले १ - १ कोटी रुपये किंमतीचे ५०० च्या नोटांचे हार!

राजस्थानमधील जिजाची देशभर चर्चा : 500 च्या नोटांनी बनवले १०० फूट लांबीचे दोन हार
Mathura Viral Wedding |  दाजींनी केले मेव्हण्यांना खुश! लग्नात दोघांच्या गळ्यात घातले १ - १ कोटी रुपये किंमतीचे ५०० च्या नोटांचे हार!
Mathura Viral Wedding | दाजींनी केले मेव्हण्यांना खुश! लग्नात दोघांच्या गळ्यात घातले १ - १ कोटी रुपये किंमतीचे ५०० च्या नोटांचे हार!
Published on: 
Updated on: 

Mathura Viral Wedding लग्नामध्ये केला जाणारा खर्च हा नेहमी चर्चेचा विषयी असतो आता असेच मथुरेमधून एक लग्नाचा विषय चर्चेत आला आहे. यामध्ये मुलांचे दाजींनी भाव खाल्ला आहे. हे लग्न होते मथुरा जिल्ह्यातील सुरीर भागातील एका गावात एक दाजींनी आपल्या दोन्ही मेव्हण्यांना नवरदेव झाल्याबद्दल प्रत्येकी एक-एक कोटी रुपयांचा हार घालून त्यांचा सन्मान केला. हे हार ५०० रुपयांच्या नोटांपासून बनवले होते व प्रत्‍येक हारांमध्ये १ कोटींची रक्कम होती. आता लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला असून, अनेक मीटर लांब असलेला हा हार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी केली होती.

१०० फूट लांबींचा नोटांचा हार

मथूरा जिल्ह्यातील सुरीर भागातील नागला फोंडा गावात शनिवारी हे आगळेवेगळे लग्न पाहायला मिळाले. दाजींनी आपल्या दोन्ही साळ्यांसाठी प्रत्येकी एक-एक कोटी रुपयांचा, जवळपास १०० फूट लांबीचे हार तयार करून घेतले होते. नवरदेवाच्या वरातीदरम्यान हे हार घालण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. परिसरात याचीच चर्चा सुरू झाली. योगेंद्र सिंग आणि कुशलपाल सिंग यांचे पुत्र प्रशांत आणि कान्हा राघव यांच्या विवाह सोहळ्याचा भाग म्हणून शनिवारी ही घोड्यांची मिरवणूक काढण्यात येत होती. त्या दोघांचे लग्न गोवर्धन येथील एका मंगणात मुडसेरास गावातील मुलींशी झाले.

राजस्थानमधील आहेत दाजी

२ कोटींचे हार घालणारे दाजी योगेश कुमार उर्फ भूरा ठाकूर हे राजस्थानमधील कामन भागातील नंदोला गावचे रहिवासी असून आपले दोन्ही मेव्हणे प्रशांत आणि कपिल यांचे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी हा खास हार तयार करून घेतला होता. ते कंत्राटदार म्हणून काम करतात. या हाराची लांबी तब्बल १०० मीटरपर्यंत होती आणि तो धरण्यासाठी डझनभर लोक लावण्यात आले होते. आता याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नवरदेवांना केले छतावर उभे

या हारांची लांबी जवळपास १०० फूट होती यामुळे घराच्या छतावर दोन्ही नवरदेव प्रशांत आणि कपिल यांना उभे करून त्यांच्या गळ्यात हा हार घालण्यात आला. याबद्दल बोलताना नवरदेव प्रशांतने सांगितले की, "माझ्या आणि माझ्या भावाच्या लग्नापूर्वी आमचे दाजी योगेश कुमार म्हणाले होते की, मी तुम्हा दोघांचे लग्न अविस्मरणीय करून दाखवेन. ते कंत्राटदार म्हणून काम करतात." त्यामुळेच त्यांनी आमच्यासाठी ही एक अनोखी भेट दिली आहे. यात नोटांपासून तयार केलेला हार बनवून घेतला आणि लग्नाच्या दिवशी वरातीच्या वेळी आम्हा दोन्ही साळ्यांना तो घातला. यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.