Mani Shankar Aiyar on Mamata Banerjee: ममतांना बनवा इंडिया आघाडीच्या प्रमुख... मणिशंकर अय्यर यांचा थेट राहुल गांधींना सल्ला

Mani Shankar Aiyar on Mamata Banerjee
Mani Shankar Aiyar on Mamata Banerjeepudhari photo
Published on
Updated on

Mani Shankar Aiyar on Mamata Banerjee: सतत वादग्रस्त विधाने करण्याची सवय असलेल्या काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी आता थेट राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यामुळं भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मणिशंकर अय्यर यांनी इंडिया आघाडीबाबत राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. त्यांनी इंडिया आघाडीची धुरा ही क्षेत्रीय दलाच्या नेत्यांकडे द्यावी असा सल्ला दिला आहे.

Mani Shankar Aiyar on Mamata Banerjee
Rahul Gandhi Bhiwandi Defamation: भिवंडी मानहानी प्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर; नवा जामीनदार निश्चित

राहुल यांना सल्ला

कोलकातामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्या आहेत. त्याच्याशिवाय या आघाडीला मजबूती मिळणार नाही. अय्यर यांनी राहुल गांधी यांना आता इंडिया आघाडीचे नेतृत्व हे ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपवावं असा सल्ला दिला आहे. अय्यर यांनी इंडिया आघाडीत अनेक अनेक क्षेत्रीय नेते आहेत जे ही भूमिका बजावू शकतात असं देखील वक्तव्य केलं आहे. च्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तेजस्वी यादव या नेत्यांचा देखील उल्लेख केला.

Mani Shankar Aiyar on Mamata Banerjee
Rahul Gandhi RSS Defamation: आरएसएस मानहानी : राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर होणार

काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

एका इंग्रजी वेबसाईटनुसार मणिशंकर अय्यर यांनी असं वक्तव्य करून पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी एक वाद निर्माण केला आहे. पश्चिम बंगालच्या काँग्रेसच्या नेत्यांनी अय्यर यांच्या या वक्तव्यावर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. महासचिव सुमन रॉय चौधरी यांनी अय्यर बऱ्याच काळापासून पक्षाच्या राजकारणापासून दूर आहेत. त्यांचे वक्तव्य अधिकृत सल्ला नाहीये. त्यांनी राज्य सभेच्या रिकाम्या झालेल्या जागेनंतर अशी वक्तव्ये केली जात आहेत.

सुमन रॉय चौधरी यांनी मणिशंकरजी तुम्हाला ममता बॅनर्जी पडद्याईडून भाजपच्या कठपुतीलसारखं काम करतात हे माहिती आहे का, भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी उभी आहे. मला वाटतं की पक्षापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला पक्षाचे कोणते निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

Mani Shankar Aiyar on Mamata Banerjee
Mamata Banerjee | डायरीपासून पेन ड्राईव्हपर्यंत

तृणमूलचं काय म्हणणं?

तृणमूल काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिाय दिली आहे. कुणाल घोष यांनी सध्याच्या घडीला आमचं सर्व लक्ष हे निवडणूक तयारीवर आहे. पक्षाचे भाजपला हरवून पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य आहे. मणिशंकर अय्यर हे खूप मोठे नेते आहेत. भाजपला विचारधारेच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा टक्कर कोण देत आहे हे पूर्ण देश पाहत आहे.

राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केल्याप्रकरणी निलंबित केलं होतं. ते गेल्या काही काळापासून प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची स्तुती करत आहेत. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची स्तुती केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news