.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेश मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एका धार्मिका कार्यक्रमादरम्यान मंदिराची भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू, तर दोघेजण जखमी झाले आहेत. अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून सर्व मलबा हटवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी दिली.
माहितीनुसार मध्यप्रदेश मधील रिवा जिल्यातील सागर येथे मोठी दुर्घटना झाली. मुलांच्या अंगावर मंदिराची भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हरदौल बाबा मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान ही दुःखद घटना सकाळी ८ . ३० च्या सुमारास घडली. ही मुले 10 ते 15 वयोगटातील आहेत. घटनास्थळावरून सर्व मलबा हटवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी दिली.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेमुळे दुःख झाल्याचे म्हटले आहे. "मला आशा आहे की जखमी झालेले लोक लवकर बरे होतील. ज्यांनी आपली मुले गमावली त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना. सरकार प्रत्येक कुटुंबाला ₹ 4 लाखांची मदत देईल,.