

Mahadev Jankar Meets Rahul Gandhi
नवी दिल्ली : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिल्लीत सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी जानकरांनी राहुल गांधींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती महोत्सवाचे निमंत्रण दिले.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. ही भेट एका कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या निमित्ताने असली तरी राजकीय वर्तूळात या भेटीची चांगलीच चर्चा झाली.
महादेव जानकर यांच्या पक्षाने ३१ मे रोजी नवी दिल्लीस्थित तालकटोरा स्टेडियममध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवासह त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली.
महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २०२४ ची लोकसभा त्यांनी महायुतीच्या सोबतीने लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी महायुतीसोबत फार सख्य राखले नाही. त्यामुळे राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर ते काँग्रेससोबत जातील का, अशा चर्चांना राजधानीत उत आला आहे.