इंदूरमध्‍ये भाजप युवा मोर्चाच्‍या उपाध्‍यक्षाची गोळ्या झाडून हत्या

पूर्व वैमनस्यातून प्रकार, मृत तरुण मंत्री विजयवर्गीय यांचा निकटवर्तीय
Madhya Pradesh News
मध्‍य प्रदेशमधील इंदूर शहरात भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्‍यक्ष मोनू कल्‍याणे याची आज ( दि. २३) गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली.Tweeter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशमधील इंदूर शहरात भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्‍यक्ष मोनू कल्‍याणे याची आज ( दि. २३) गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. तो मध्‍य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा निकटवत्तीय होते. शहरातील एमजी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात ही घटना घडली. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्‍याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू कल्याण हा शनिवारी रात्री भगवा यात्रेच्या तयारीत होता. पियुष आणि अर्जुन नावाचे दोन युवक दुचाकीवरून चिमणबाग चौकात आले. दुचाकीवर बसून दोघेही मोनूशी चर्चा करत होते.. दरम्यान, दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुनने पिस्तुल काढून मोनू कल्याणे यांच्यावर गोळीबार केला. यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. चिमणाबाग चौकात उपस्थित असलेल्या मोनूच्या मित्रांवरही आरोपींनी गोळीबार केला, मात्र ते बचावले. जखमी झालेल्या मोनूला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदूर विधानसभेचे माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांचा समर्थकांसह मोनूच्या घरी जावू त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. या घटनेबाबत माध्‍यमांशी बोलताना कैलाश विजयवर्गीय म्‍हणाले की, 'ही अत्यंत दुःखद घटना आहे. मारेकऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मी प्रशासनाला केली आहे. मोनू कल्याण आमचा चांगला कार्यकर्ता होता. पक्षाचे पदाधिकारी होता. होते. मोनूवर त्‍याच्‍या शेजारी राहणार्‍या तरुणांनी गोळ्यघ झाडल्‍याची माहिती मला मिळाली आहे. त्याच्या कौटुंबिक वादाची मला माहिती नाही. इंदूरची कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. दहा-वीस खून झाले आहेत असे नाही. आता शेजाऱ्यानेच खून केला असेल तर याप्रकरणी पोलीस प्रशासन काय करू शकते? मात्र शहरात टोळीयुद्ध सुरू नाही, असा दावाही विजयवर्गीय यांनी केला.

vice president

shooting

crime news

murder case

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news