Lok sabha Election 2024 Results : सलग दुसऱ्यांदा 10 लाखांहून अधिक मते मिळवणारे शंकर लालवानी कोण आहेत?

Lok sabha Election 2024 Results : सलग दुसऱ्यांदा 10 लाखांहून अधिक मते मिळवणारे शंकर लालवानी कोण आहेत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शंकर लालवानी यांनी 'महाविक्रम' केला आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघातून लालवानी यांना सलग दुसऱ्यांदा 10 लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी इंदूर लोकसभा जागा भाजपसाठी सर्वात सुरक्षित जागांपैकी एक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही लालवाणी यांनी ही जागा जिंकली होती.

विजयाचा 'महाविक्रम'

इंदूरच्या जनतेने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शंकर लालवानी यांना 12 लाख 26 हजारांहून अधिक मताधिक्य दिले. लालवानी यांनी बहुजन समाज पक्षाचे संजय सोलंकी यांचा 10 लाख 8 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. संजय सोळंकी यांना केवळ 51,659 मते मिळाली आहेत. लालवानी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 10 लाख 68 हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे पंकज संघवी यांचा 5 लाख 47 हजारांहून अधिक मताधिक्यानी पराभव केला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला 5 लाख 20 हजारांहून अधिक मते मिळाली होती.

कोण आहेत शंकर लालवानी?

भारतीय जनता पक्षाचे खासदार शंकर लालवानी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1961 रोजी इंदूरमध्ये झाला. खासदार होण्यापूर्वी ते इंदूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही होते. त्यांनी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. 23 मे 2019 रोजी त्यांनी इंदूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकली. 2019 मध्ये, भारतीय जनता पक्षाने त्यांना तत्कालीन लोकसभा अध्यक्ष आणि इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांच्या जागी तिकीट दिले होते.

सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे शंकर लालवानी यांचे मूळ पाकिस्तानातील आहे. 1947 साली फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले आण्इ त्यानंतर मध्य प्रदेशात स्थायिक झाले. शंकर लालवानी 1994 मध्ये राजकारणात आले. त्यानंतर इंदूर महापालिकेत नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. 1999 ते 2004 दरम्यान ते इंदूर महानगरपालिकेत पीडब्ल्यूडीचे अध्यक्ष होते. त्याच वेळी, 2013 ते 2018 पर्यंत त्यांनी इंदूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद भूषवले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news