Made in India Bullet Train! भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन आकार घेतेय! बॉडीपासून सीटपर्यंत... पाहा पहिली झलक

280 किमी वेग, 557 प्रवासी अन् अत्याधुनिक सुविधा; BEMLकडून निर्मितीला सुरुवात
Made in India Bullet Train!
Made in India Bullet Train! भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन आकार घेतेय! बॉडीपासून सीटपर्यंत... पाहा पहिली झलकfile photo
Published on: 
Updated on: 

made in india bullet train beml manufacturing ashwini vaishnaw bengaluru facility b28 speed features

पुढारी ऑनलाईन : भारताची पहिली स्वदेशी डिझाइन केलेली बुलेट ट्रेन आकार घेत आहे. विशेष म्हणजे, भारतात धावणारी ही बुलेट ट्रेन पूर्णपणे मेड इन इंडिया असणार आहे. जपानी इंजिनिअर्सच्या देखरेखीखाली भारतीय इंजिनिअर्स देशाच्या गरजा लक्षात घेऊन या ट्रेनची रचना करत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) च्या बंगळुरू येथील कारखान्यात तयार होत असलेल्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या निर्मितीची झलक शेअर केली आहे. ही ट्रेन मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावणार आहे.

Made in India Bullet Train!
Hanuman Chalisa : हनुमान चालिसेचे पठण करण्यासाठी कोणती वेळ शुभ? जाणून घ्या, विधी आणि नियम!

B28 असे आहे पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनचे नाव

भारताच्या या पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनला B28 असे नाव देण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय अभियांत्रिकीच्या संगमातून ही ट्रेन तयार केली जात आहे. ट्रेनची मजबुती आणि अतिवेगाने धावण्याची क्षमता तपासण्यासाठी तिच्या स्ट्रक्चरल टेस्टिंगचे काम सुरू आहे. भारतीय प्रवाशांच्या गरजा, आराम आणि सुरक्षितता लक्षात घेऊन या ट्रेनची रचना करण्यात आली आहे.

बंगळुरू येथील BEML कारखान्यात सुरू आहे निर्मिती

या बुलेट ट्रेनची निर्मिती बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) च्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये केली जात आहे. येथेच ट्रेनचे वेगवेगळे भाग तयार करणे आणि त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. अवजड यंत्रसामग्री आणि उपकरणांची निर्मिती करणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी BEML भारताच्या पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देशातील हायस्पीड ट्रेन निर्मितीची क्षमता वाढवण्याच्या दिशेनेही हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

Made in India Bullet Train!
Tusshar Kapoor : तुषार कपूरला धमकीचा फोन; बिश्नोई टोळीच्या सदस्याने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा

280 किमी प्रतितास असेल बुलेट ट्रेनचा चाचणी वेग

B28 ट्रेनसेटची रचना ताशी 280 किलोमीटर या कमाल चाचणी वेगानुसार केली जात आहे. मात्र, तिचा प्रस्तावित ऑपरेशनल वेग ताशी 249 किलोमीटर असणार आहे. सुमारे 202 मीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये एकूण 8 डबे असतील. यामध्ये 4 मोटर कार आणि 4 ट्रेलर कारचा समावेश असेल. ट्रेनच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन असणार आहेत. त्यामुळे ही ट्रेन दोन्ही दिशांनी धावू शकणार आहे. प्रवाशांच्या आरामाचा विचार करून ट्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आसनव्यवस्थेची सुविधा असेल.

एकाच वेळी 557 प्रवासी करू शकतील प्रवास

या बुलेट ट्रेनच्या डब्यांच्या आतील भागाचे हे कॉम्प्युटराइज्ड थ्रीडी चित्र आहे. ट्रेन तयार झाल्यानंतर आतील दृश्य साधारण असेच दिसणार आहे. या बुलेट ट्रेनमधून एकाच वेळी सुमारे 557 प्रवासी प्रवास करू शकतील. यामध्ये 7 स्टँडर्ड क्लास आणि 1 एक्झिक्युटिव्ह क्लास डबा असेल. स्टँडर्ड क्लासमध्ये 3x2 पद्धतीने आसनव्यवस्था असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 2x2 पद्धतीने सीट्स असतील. दिव्यांग प्रवासी आणि चालण्या-फिरण्यात अडचण येणाऱ्या व्यक्तींसाठीही दोन विशेष जागा ठेवण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास दोन 8 डब्यांच्या ट्रेन एकमेकांना जोडून 16 डब्यांची ट्रेन तयार करता येऊ शकते.

ट्रेनमध्ये मिळणार या आधुनिक सुविधा

B28 ट्रेनचे इंटिरिअर प्रवाशांचा आराम लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. यामध्ये आरामदायी सीट्स, पाय पसरवण्यासाठी पुरेशी जागा, मोठ्या खिडक्या, एलईडी लाइट्स आणि सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला रॅक असतील. मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी पॉवर सॉकेट्सची सुविधाही असेल. मोठ्या बॅगा ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. याशिवाय आधुनिक बायो-डायजेस्टर टॉयलेट्सही बसवण्यात येणार आहेत.

वाय-फाय, मनोरंजन आणि तीन भाषांमध्ये मिळणार माहिती

या ट्रेनमध्ये प्रवाशांना वाय-फाय आधारित मनोरंजन प्रणाली मिळणार आहे. याच्या माध्यमातून प्रवासादरम्यान प्रवासी मनोरंजनविषयक कंटेंट पाहू शकतील. डब्यांमध्ये लावलेल्या एलसीडी स्क्रीनवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये आवश्यक माहिती दाखवली जाईल. ऑडिओ अनाउन्समेंटद्वारेही प्रवाशांना वेळोवेळी अपडेट्स दिले जातील. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना टॉक-बॅक सुविधेच्या माध्यमातून ट्रेनमधील कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.