LPG ship | अमेरिका - इराणला चकवा देत एलपीजी जहाज भारतात

रडारच्या नजरेतून सुटले अन् मिशन फत्ते झाले
LPG ship |
LPG ship | अमेरिका - इराणला चकवा देत एलपीजी जहाज भारतात
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ट्रान्सपॉन्डर्स तात्पुरते बंद ठेवून अमेरिका आणि इराणला हूल देत पश्चिम आशियातील भयानक तणावातून वाट काढत एक भारतीय जहाज तब्बल 20 हजार टन एलपीजी घेऊन रविवारी सकाळी गुजरातच्या कांडला येथील दीनदयाळ बंदरावर दाखल झाले. भारतासाठी ही दिलासादायक बातमी मानली जाते.

मार्शल आयलँडचा ध्वज असलेले ‘सिमी’ नावाचे जहाज 13 मे 2026 रोजी स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून बाहेर पडले. पश्चिम आशियातील तणावामुळे हा सागरी मार्ग सध्या अत्यंत असुरक्षित बनला आहे. या पार्श्वभूमीवर हे जहाज भारतात दाखल झाले आहे.

चार मंत्रालयांचा समन्वय

अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही मोहीम पार पाडण्यासाठी सरकारची चार मंत्रालये परस्परांच्या संपर्कात होती. सरकारी सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, डीजी शिपिंग, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या उत्तम कामगिरीमुळेच ही मोहीम यशस्वी झाली. मार्च महिन्यापासून या धोकादायक मार्गावरून भारतात पोहोचलेले हे 13 वे जहाज आहे. यापाठोपाठ व्हिएतनामचे 46,427 टन इंधन घेऊन येणारे ‘एनव्ही सनशाईन’ हे जहाज न्यू मंगलोर बंदराकडे येत आहे.

इराण-अमेरिकेला अशी दिली हूल

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने कतारच्या रास लफ्फान टर्मिनलवरून खरेदी केलेल्या या जहाजावर 20 हजार टन लिक्विड प्रोपेन आणि ब्युटेन होते. अमेरिकेची नाकेबंदी आणि ओमानच्या खाडीत इराणी नौदलाचा पहारा असतानाही जहाजावरील 21 परदेशी क्रू मेंबर्सनी हे जहाज सुरक्षितपणे बाहेर काढले. युद्ध क्षेत्रातून जाताना जहाजाचे ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ट्रान्सपॉन्डर्स तात्पुरते बंद करण्यात आले होते. यामुळे ते रडारच्या नजरेतून सुटले आणि इराणच्या लारक बेटाजवळ सुखरूप पोहोचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news