LPG Price | गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

अर्थसंकल्पानंतर तेल विपणन कंपन्यांचा ग्राहकांना झटका
LPG Price
गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून एलपीजी गॅस सिलिंडर महागाईचा ग्राहकांना झटका बसणार आहे. अर्थसंकल्पानंतर तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ८.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाली आहे. तर १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती या वेळीही कायम आहेत.

मुंबईतील आजचे एलपीजी सिलिंडरचे दर

आज १ ऑगस्टपासून मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. तर १९ किलोच्या निळ्या सिलेंडरची किंमत १६०५ रुपये झाली आहे. पूर्वी तो १५९८ रुपये होती. चेन्नईतही एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता येथे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १८१७ रुपयांना मिळणार आहे. पूर्वी तो १८०९.५० रुपये होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news