मोठी बातमी! LPG गॅस सिलिंडर ३० रूपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

आजपासून नवे दर लागू, घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही
LPG Gas Price
व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या आहेत. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोमवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

LPG Gas Price
हिंदूंचे वार्षिक उत्पन्न 19 टक्के, शिखांचे 57 टक्के वाढले

आजपासून १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत आता ३० रुपयांनी किंमत कमी होऊन १५९८ तर दिल्लीत १६४६ रुपये झाली आहे. यापूर्वी दिल्लीत १६७६ रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये १७५६ रुपयांना मिळणार आहे, आधी त्याची किंमत १७८७ रुपये होती. बदललेले दर आज १ जुलै पासून लागू होणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news