LPG price | अर्थसंकल्पाच्या दिवशी पहिली आनंदाची बातमी; एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त

जाणून घ्या नवीन दर
LPG Price
अर्थसंकल्पाच्या दिवशी पहिली आनंदाची बातमी; एलपीजी सिलिंडर झाला स्वस्तfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : LPG price | देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सिलेंडरची किंमत ७ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आज पासून १८०४ रुपयांवरून १७९७ रुपयांवर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

तेल विपणन कंपनीने १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आज, १ फेब्रुवारी पासून नवीन दर लागू होणार आहेत. दिल्लीत दर १७९७ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. तर कोलकातामध्ये १९११ रुपयांवरून १९०७ रुपयांवर किंमत कमी झाली आहे. मुंबईत १७५६ रुपयांऐवजी १७४९.५० रुपयांना गॅस उपलब्ध होईल आणि चेन्नईमध्ये ही किंमत १९६६ रुपयांवरून १९५९.५० रुपयांवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news