LPG price hike: एलपीजी सिलिंडर महागला: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा झटका, पाहा नवे दर

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात काही नव्या नियमांसह झाली असून, महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार फटका बसला आहे.
Commercial LPG Cylinder Price
Commercial LPG Cylinder PricePudhari
Published on: 
Updated on: 

LPG cylinder price hike

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्याची सुरुवात काही नव्या नियमांसह झाली असून, महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार फटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळीच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करत नवे दर जाहीर केले आहेत. सणासुदीच्या तोंडावर सिलिंडर महागला आहे. कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ केली असून, प्रति सिलिंडर ६२.५० रुपयांची भर पडली आहे.

मुंबईत १९ किलोचा सिलिंडर कितीला?

१ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार, मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २,७६४ रुपये इतकी झाली आहे. राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ६२.५० रुपयांनी वाढून आता २,८१० रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीसही १९ किलोच्या सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती, तेव्हा दिल्लीत तो ९.५० रुपयांनी महागला होता. आता दसरा, दिवाळीच्या अगदी तोंडावर एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायांवरील खर्च वाढणार असून, त्यांच्यासाठी हा मोठा आर्थिक फटका मानला जात आहे.

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

एकीकडे व्यावसायिक सिलिंडर महागले असले, तरी सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर जुन्याच दराने मिळत आहे.

प्रमुख शहरांमधील १४.२ किलो घरगुती सिलिंडरचे सध्याचे दर

दिल्ली: ९४२ रुपये

मुंबई: ९४१.५० रुपये

चेन्नई: ९५७.५० रुपये

कोलकाता: ९६८ रुपये

सर्वात महाग सिलिंडर कोठे?

व्यावसायिक सिलिंडरच्या ताज्या दरवाढीनंतर देशातील विविध शहरांमधील दरांवर नजर टाकल्यास, १ ऑक्टोबरपासून १९ किलोचा सिलिंडर बिहारची राजधानी पटना येथे सर्वाधिक महाग मिळत आहे. तिथे सिलिंडरची किंमत ३,०२९ रुपयांवरून वाढून थेट ३,१००.५० रुपये झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news