New LPG connection Hold: नवीन LPG कनेक्शन होल्डवर, युद्धामुळं पुरवठा विस्कळीत; कंपनी अन् मंत्रालयानं काय सांगितलं?

New LPG connection Hold
New LPG connection HoldPUDHARI
Published on
Updated on

New LPG connection Hold: जेव्हापासून मध्य पूर्व आशियात युद्धाचा भडका उडला आहे तेव्हापासून भारतात एलपीजी गॅसचा पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. आता गॅस सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिसांची वाट पहावी लागत आहे. ग्रामीण भागात तर हा प्रतिक्षेचा काळ ४५ दिवसांवर पोहचला आहे.

दरम्यान, एका ग्राहकाने ट्विटर त्याला नवीन एलपीजी गॅस कनेक्शन मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. त्यावर आता सरकारी कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करून प्रत्युत्तर दिलं. त्यात बीपीसीएल म्हणते की, 'भूराजकीय परिस्थिती पाहता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन देणे काही काळासाठी बंद केलेलं आहे. सध्या वितरक हे गॅस रिफ्युअलिंगवरच जास्त भर देत आहेत. जी काही असुविधा होत आहे त्याची कारणे आमच्या नियंत्रणाबाहेरची आहेत.'

New LPG connection Hold
LPG Crisis : केंद्राचा मोठा निर्णय! PNG असलेल्या भागात LPG पुरवठा होणार बंद, गॅस वाहिनी जोडणीसाठी ४८ तासांची डेडलाईन

पेट्रोलियम मंत्रालयानं काय सांगितलं?

तणावपूर्ण भूराजकीय परिस्थिती कायम राहिल्यानं गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत बुधवारी पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितलं की, 'घरगुती वापरासाठीच्या एलपीजीच्या पुरवठ्याला प्राधान्य दिलं जात आहे. सध्याच्या घडीला तरी एलपीजी वितरकांकडील साठा संपुष्टात येत आहे अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.'

दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालय, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल आणि हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर मिळालेलं नाही.

New LPG connection Hold
LPG Crisis: LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता सिलिंडर खरचं 10 किलोचा मिळणार का? सरकारने दिलं स्पष्टीकरण

वितरकांनी सांगितली परिस्थिती

ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युशन फडरेशनचे उत्तर प्रदेश सर्कलचे अध्यक्ष जगदीश राय यांनी सांगितलं की, 'नोंदनी देखील सध्या स्थगित करण्यात आलेली आहे. मात्र काही केसमध्ये जसं की एचपीसीएलच्या केसमध्ये नोंदणी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र सिलिंडरची डिलिव्हरी पूर्ववत झालेली नाही. तसेच दोन कनेक्शन असलेल्या घरात देखील सिलिंडर विक्री स्थगित करण्यात आलेली आहे.

New LPG connection Hold
LPG cylinder: ५ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी आता एड्रेस प्रूफची गरज नाही; फक्त 'हे' एक कार्ड दाखवा आणि सिलेंडर घरी न्या!

पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर

सरकार देखील आता ग्राहकांना एलपीजी ऐवजी पीएनजी गॅसकडे स्विच करण्यावर भर देत आहे. युद्ध फेब्रुवारीच्या शेवटी सुरू झालं होतं. त्यानंतर ४० हजार ६०० पेक्षा जास्त घरात पीएनजी गॅसचे कनेक्शन जोडण्यात आलेलं आहे. आता प्रधान मंत्री उज्वला योजानेअंतर्गत मिळालेल्या एलपीजी गॅस कनेक्शन देखील पीएनजीवर शिफ्ट करण्यात येत आहेत असं प्रशांत वशिष्ठ यांनी सांगितलं. २०३० पर्यंत जवळपास ३० मिलियन एलपीजी कनेक्शन हे पीएनजीवर शिफ्ट केले जाऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news