LPG Booking Rules Change: इराण-इस्त्रायल-युएस युद्धाच्या पार्श्वभूमीवर LPG Booking नियमात मोठा बदल, आता इतके दिवस पहावी लागणार वाट

LPG Booking Rules Change
LPG Booking Rules Changepudhari photo
Published on
Updated on

LPG Booking Rules Change: इराण - इस्त्रायल - युएस युद्धाचा परिणाम आता भारतातील स्वयंपाक घरात जाणवू लागला आहे. आधीच एलपीजी सिलिंडरचे दर ५० ते ६० रूपयांनी वाढले आहेत. त्यातच आता गॅस सिलिंडर रिफील करण्याचे नियम देखील बदलले आहेत.

प्रशासनानं घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर रिफील नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल जागतिक स्थिती पाहून करण्यात आले आहेत. यापूर्वी गॅसचा सिलिंडर बूक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बूक करण्यासाठी १५ दिवसांचा वेटिंग टाईम होता. आता नव्या नियमानुसार या वेटिंग टाईम वाढवण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता एका बुकिंगनंतर दुसरा सिलिंडर बूक करण्यासाठी १५ दिवसांऐवजी २१ दिवस वाट पहावी लागणार आहे.

नव्या नियानुसार कंपन्यांनी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आधीच अपडेट करणं सुरू केलं आहे. नव्या नियमानुसार जरी वेटिंग टाईम वाढला असला तरी बुकिंगच्या प्रक्रियेत कोणाताही बदल करण्यात आलेला नाही.

वर्षाला १५ सिलिंडर

तेल कपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरसाठी काही नियमावली सेट केली आहे. या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला १२ सबसिडाईज सिलिंडर आणि अतिरिक्त नॉन सबसिडाईज सिलिंडर प्रत्येक वर्षी मिळतात. याचा अर्थ १ एप्रिल ते मार्च ३१ पर्यंत एका गॅस कनेक्शनवर वर्षाला एकूण १५ गॅस सिलिंडर मिळू शकतात.

२४ तासाच्या आत सिलिंडर डिलिव्हरी नियम

तेल कंपन्यांनी एजन्सीला गॅस सिलिंडर बुकिंग केल्यानंतर ते २४ तासाच्या आत सिलिंडर देणं बंधनकारक केलं आहे. या नियमामुळं देशातील अनेक गॅस सिलिंडर ग्राहकांची मोठी सोय झाली आहे.

२१ दिवसांनंतरच उपलब्ध होणार सिलिंडर

नुकत्याच लागू झालेल्या नव्या नियमानुसार तुम्हाला आता तुमचे दुसरे सिलिंडर हे पहिले सिलिंडर मिळाल्यानंतर २१ दिवसानंतरच मिळणार आहे. कंपनीने आपल्या सॉफ्टवेअरमध्ये नवीन नियमानुसार दिवस लॉक केले आहेत. असं अशलं तरी अधिकाऱ्यांनी देशात गॅस सिलिंडरचे शॉर्टेज नाहीये असं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळं अधिकाऱ्यांनी देशातील ग्राहकांना कोणतीही काळजी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रत्येकाला जवढे गरजेचे आहेत तेवढे सिलिंडर मिळत राहणार असल्याचं सांगितलं. तसेच पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून आता गॅस रिफ्युअलिंग प्लांट हे रविवारी देखील सुरू राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news