संसदेत शपथ घेताना शिवसेना खासदाराला अध्यक्षांनी थांबवलं

शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख; अध्यांक्षांचा आक्षेप
Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath
संसदेत शपथ घेताना शिवसेनेच्या खासदाराला अध्यक्षांनी थांबवलंfile photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिंगोलीतून निवडून आलेले खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांना खासदारकीची शपथ घेताना लोकसभा अध्यक्षांनी मध्येच थांबवलं. मराठीतून शपथ घेत असताना खासदार आष्टीकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यावर हंगामी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांनी त्यांना आक्षेप घेत थांबवले आणि विहित नमुन्यात लिहिल्याप्रमाणे पुन्हा शपथ घेण्यास सांगितले.

अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी आष्टीकर यांचे नाव पुकारले असता ते व्यासपीठावर पोहोचले, त्यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असा उल्लेख करून शपथविधीला सुरुवात केली. यावर अध्यक्षांनी त्यांना थांबवले; 'ऐका, असे करू नये. जे प्रतिज्ञापत्रात मराठीत आहे तेच वाचा' असे सांगितले. त्यानंतर आष्टीकर यांनी लोकसभा सचिवालयाने व्यासपीठावर ठेवलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पुन्हा शपथ घेतली.

महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली शपथ

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, दिल्ली, दादरा नगर या राज्यांतील सदस्य हवेली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लडाख आणि मध्य प्रदेशातील नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेताना, ८ व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही भाषेत शपथ घेता येते. लोकसभेत मराठी, मैथिली, संस्कृत, पंजाबी अशा भाषांमध्ये खासदारांनी शपथ घेतली. आज पहिल्यांदा महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेतली, त्यांच्यानंतर मणिपूर, नागालँड आणि ओडिशाच्या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news