हेलिकॉप्टरचा ताफा आज लष्करात दाखल होणार; दर मिनिटाला ७५० गोळ्या डागण्याची क्षमता

हेलिकॉप्टरचा ताफा आज लष्करात दाखल होणार; दर मिनिटाला ७५० गोळ्या डागण्याची क्षमता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दर मिनिटाला ७५० गोळ्या डागण्याची क्षमता असलेल्या मेक ईन इंडियाच्या अंतर्गत विकसित केलेली स्वदेशी बनावटीची लाईट कॉम्बेट हेलिकॉप्टर्स (एलसीएच) भारतीय लष्करात दाखल होणार आहेत. ही हेलिकॉप्टर एकाचवेळी हवाई दलासह भूदलामध्ये वापरली जाणार आहेत. सोमवारी (दि. 3) 90 व्या भारतीय हवाईदल दिनानिमित्त जोधपूर येथे 10 'एलसीएच'चा ताफा हवाई दलात आणि अन्य पाच भूदलांत औपचारकिरीत्या दाखल होणार आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी उपस्थित राहणार आहेत. सुमारे 3 हजार 885 कोटी रुपये खर्चून 'एलसीएच'ची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिकल्सकडून करण्यात आली आहे. लष्कराकडून गेल्या दोन दशकांपासून या हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली होती.

'एलसीएच'ची वैशिष्ट्ये

  • दर मिनिटाला 750 गोळ्या डागण्याची क्षमता
  • स्वदेशी डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान
  • 5.8 टन वजन असणार्‍या हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिन्स
  • कोणत्याही हवामानात उड्डाण भरण्याची क्षमता
  • आकाशातून शत्रूवर नजर ठेवण्यास सक्षम
  • हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता
  • फॉरवर्ड इन्फ्रारेड सर्च, सीसीडी कॅमेरा आणि थर्मल व्हिजन आणि लेसर शोधण्यास सक्षम
  • रात्रीच्या मोहिमा आणि अपघात टाळण्याची क्षमता

लडाखमध्ये 'एलसीएच' तैनात

1996 मध्ये कारगील युद्धात शत्रू उंचीवर असताना 'एलसीएच'सारख्या हेलिकॉप्टरची उणीव भासली होती. या लिकॉप्टरबाबतची माहिती पहिल्यांदा 2006 मध्ये सरकारला समजली. 2015 मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी हेलिकॉप्टरने 20 हजार ते 25 हजार फूट उंचीवर उड्डाण भरले. गेल्या वर्षी चीनसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर या हेलिकॉप्टरचे दोन ताफे लडाखमध्ये तैनात करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news