

Lalu Prasad Yadav Family Feud:
लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात विधानसभा निवडणुकीनंतर मोठा गृहकलह सुरू झाल्याचं दिसलं. आरजेडीचा विधानसभा निवडणुकीत दारून पराभव झाला. त्यांना अवघ्या २५ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला.
ज्या मुलीनं लालू प्रसाद यादव यांना स्वतःची किडनी दिली त्या रोहिणी आचार्य यांनी घरात त्यांच्यावर चप्पल उगारण्यात आलं अन् किडनी देण्यावरून वाईट बोलण्यात आलं असा आरोप केला. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वादानंतर चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य यांच्या संपत्तीची देखील चर्चेत आली आहे.
लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्या संपत्तीची तुलना केली जात आहे. आरजेडीची सूत्रे आपल्या हातात घेतलेल्या तेजस्वी यादव यांची संपत्ती जास्त असेल असा अंदाज काही जणं लावत असतील. मात्र रोहिणी आचार्य यांनी या सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांची संपत्ती ही तेजस्वी यादव यांच्यापेक्षा चारपट आहे. एवढंच नाही तर त्यांचे पती शमशेर सिंह देखील चांगला पैसा राखून आहेत.
लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची संपत्ती ही करोडो रूपयात आहे. विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तेजस्वी यादव यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती जवळपास ८.१ कोटी रूपये आहे. त्यांच्याकडे ६.१२ कोटी रूपयांची चल संपत्ती असून १.८८ कोटी रूपयांची अचल संपत्ती आहे.
त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यावेळी त्यांनी १.५ लाख रूपये कॅश आणि लाखो रूपयांच्या बँक एफडी असल्याची माहिती दिली होती. त्यांच्यावर १.३५ कोटी रूपयांचे सरकारी कर्ज आहे त्याचबरोबर त्यांच्यावर ५५.५५ लाख रूपयांचे दुसरे कर्ज देखील आहे.
तेजस्वी यादव आणि त्यांचे दोन सहकारी संजय यादव अन् रमीज यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या रोहिणी आचार्य तेजस्वींपेक्षा कित्येक पटीनं जास्त संपत्ती बाळगून आहेत. गेल्या वर्षी २०२४ मध्ये रोहिणी आचार्य यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला होता. त्यांनी सारण मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं.
या प्रतिज्ञापत्रानुसार रोहिणी आचार्य यांची नेट वर्थ ही ३६.६२ कोटी रूपये इतकी आहे. त्यांच्यावर जवळपास १.३० कोटी रूपये कर्ज आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे ४९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५.५० किलो चांदी आणि ५ लाख रूपये किंमतीची रत्नं देखील आहेत.
रोहिणी यांच्या नावावर १ करोड किंमतीची व्यावसायिक बिल्डिंग, ११ कोटी रूपयांची रेसिडेंशिअल प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी मुंबई आणि पटाना इथं आहे.
रोहिणी यांचा २००२ मध्ये शमशेर सिंह यांच्याशी विवाह झाला. ते दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी राहिले आहेत. त्यांनी INSEAD संस्थेतून फायनान्स मधून एमबीए केलं होतं. त्यांनी सिंगापूर आणि जकार्तामधील अनेक बड्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. त्यांनी स्टँडर्ड चार्टर बँकेत देखील दीर्घकाळ काम केलं आहे. सध्या ते सिंगापूरमधील Evercore मध्ये इन्वेस्टमेंट बँकर म्हणून काम करत आहेत.
त्यांच्या संपत्तीबाबत अधिकृत अशी माहिती उपलब्ध नाही. मात्र रोहिणी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार शमशेर सिंह यांच्याकडं १० लाख रूपये कॅश आणि १.५ कोटी रूपयांपेक्षा जास्त बँक डिपॉझिट आहेत. तर शेअर्स बॉन्डमध्ये २ कोटी रूपये गुंतवणूक आहे. १५ लाखाची पॉलिसी, ४० लाखाची गाडी आणि ३२ लाख रूपयांची सोने, हिऱ्याचे दागिने आहेत. त्यांच्या नावावर १.२७ कोटी रूपयांची शेतजमीन देखील आहे. तर ३९ लाख रूपयांची नॉन अॅग्रिकल्चरल लँड देखील आहे.
त्यांचे मुंबईतील विले पार्ले भागात १० कोटी रूपये किंमतीचे दोन अपार्टमेंट आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद, बडोदा, पटानामध्ये लाखो रूपयांची घरे देखील आहेत.