Ladakh Protest Clashed With The Police :
लेह लडाख हा भाग देशातील सर्वात शांत भाग आणि निसर्गाचं सुंदर रूप मिळाला भाग म्हणून ओळखला जातो. या भागात बौद्ध धर्मीय लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. यापूर्वी लडाखमध्ये आंदोलनं, जाळपोळ, दगडफेक अशा घडना घडल्याचं फारसं ऐकिवात नाही. मात्र आज (दि. २४) सकाळी लडाखमधील लेह सिटीमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात हिंसक झडप झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांची गाडी देखील पेटवण्यात आली.
लेहमध्ये आज हजारो आंदोलक लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि त्यांच्या संविधानिक हितांचं रक्षण केलं जावं यासाठी आंदोलन करत होते. त्यांनी उपोषण आणि संपूर्ण शटडाऊनचा नारा दिला होता.
मात्र या आदोलनाला हिंसक वळण लागलं. चिडलेल्या आंदोलकांनी लेह मधील भाजपचं कार्यालय फोडलं. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक देखील सुरू करण्यात आली. आंदोलकांनी पोलिसांची गाडी देखील पेटवून दिली.
यानंतर पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. तसंच लाठी चार्ज देखील केला. लडाखमध्ये अशा प्रकारचं हिंसक आंदोलन पहिल्यांदाच होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी सरकारनं लडाखच्या प्रतिनिधिंसोबत बैठक बोलवली आहे. ही बैठक ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचू यांनी लडाखमध्ये याच मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे. त्यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानातील सहाव्या शेड्युलप्रमाणं विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
लडाख केंद्र शासित केल्यापासून तिथं अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता गेल्या तीन वर्षापासून आहे. या भागातील लोकं सतत लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी आमची जमीन, संस्कृती आणि नैसर्गिक साधन संपत्तीतचं घटनेच्या तरतुदीनुसार सरंक्षण व्हावं अशी मागणी केली आहे.