Kolkata Rape-Murder Case | सीबीआय करणार आरोपीची मनोविश्लेषण चाचणी

डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली
Kolkata Rape-Murder Case
सीबीआय आरोपीची मनोविश्लेषण चाचणी करणार file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपीची मनोविश्लेषण चाचणी करण्यात येणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य आरोपी संजय रॉय याच्या मनोविश्लेषण चाचणीसाठी शनिवारी दिल्लीच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) मधून तज्ञांची एक टीम पाठवली आहे. या चाचणीद्वारे सीबीआयची टीम आरोपीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार असून त्याची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

कोलकाताच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर क्रुर बलात्कार आणि हत्येच्या घटनेने देश हादरला आहे. घटनेच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. कोलकातासह देशभरात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पीडितेच्या शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार सामूहिक बलात्काराचा असू शकतो, असे दिसून आले होते. पीडित तरुणीच्या शरीरात १५० मिलिग्रॅम इतके विर्य मिळून आले, हे प्रमाण लक्षात घेता या बलात्कार प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असू शकतो, असे तपासात समोर आले आहे.

सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह सापडल्यानंतर कोलकाता पोलिसांनी संजय रॉय याला अटक केली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी हा एक प्रशिक्षित बॉक्सर आहे. त्याने काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध निर्माण केले. तो २०१९ पासून कोलकाता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापन गटामध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता.

Kolkata Rape-Murder Case
Kolkata Rape-Murder Case : रिचा चढ्ढा म्हणाली, "बलात्काऱ्यांना हार..."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news