पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल येथील कोलकातामध्ये शासकीय रुग्णालयातील (आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय) प्रशिक्षणार्थी डॉक्टर (पीजी, द्वितीय वर्ष) युवतीवर बलात्कारानंतर तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी संपुर्ण देशामध्ये तीव्र निदर्शने सुरु आहेत. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना ड्युटीवर परत जाण्यासाठी फटकारले आहे. तसेच बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथून चक्रवर्ती हे सुद्धा पिडीत तरुणीला न्याय मिळावा यासाठी निदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत. याची माहिती पीटीआयने एका व्हिडीओद्वारे दिली आहे.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकऱणात सहभागी झाल्यानंतर अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी पीटीआयसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले "बंगाल हे अन्यायाविरुद्ध लढणारे राज्य आहे. आतापर्यंत आमचा आवाज दाबला गेला आहे. आता लोक कोणालाही घाबरत नाहीत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही."