ममता बॅनर्जी देणार राजीनामा, आंदोलक डॉक्टरांशी चर्चा फिस्कटल्यानंतर म्हणाल्या...

Kolkata Rape-Murder Case : 2 तास वाट पाहिली मात्र डॉक्टर चर्चेला आलेच नाहीत
Kolkata Rape-Murder Case Mamata Banerjee
ममता बॅनर्जीFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kolkata Rape-Murder Case Mamata Banerjee : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपावर गेलेल्या कनिष्ठ डॉक्टरांशी आजही राज्य सरकार चर्चा करू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगाल सरकारने आंदोलक डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते. आंदोलक डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जीही तेथे पोहोचल्या होत्या. त्यांनी संपकरी डॉक्टरांशी बोलण्यासाठी दोन तास वाट पाहिली मात्र डॉक्टर चर्चेला आलेच नाहीत. या गोंधळानंतर ममता बॅनर्जी यांनी, ‘मी हात जोडून बंगालच्या जनतेची माफी मागते. आम्ही डॉक्टरांना कामावर परत आणू शकलो नाही. जनतेच्या हितासाठी राजीनामा देण्यास तयार आहे,’ असे विधान केले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, राज्यात 27 लोकांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. मात्र तरीही डॉक्टर संपावर आहेत. मी तीन वेळा प्रयत्न केला, पण डॉक्टरांशी भेट होऊ शकली नाही. आता कोणतीही बैठक झाली तर ती मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांसोबत असेल’, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मी राजीनामा देण्यास तयार’

‘काही लोकांना माझी खुर्ची हवी आहे. मी राजीनामा देण्यास तयार आहे. मला सत्तेची भूक नाही. बहुतेक लोक सभेला यायला तयार होते. पण एक-दोन जणांनी बोलू नका अशा सूचना बाहेरून येत होत्या. बंगालची जनता वाट पाहत होती की निदान आज तरी तोडगा निघेल. डॉक्टरांना ड्युटीवर न आणल्याबद्दल मला त्यांची माफी मागायची आहे. मी बंगालच्या जनतेची हात जोडून माफी मागते. मी तास वाट पाहिली. पण तोडगा निघाला नाही,’ असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

डॉक्टरांची ममतासोबतची बैठक का अयशस्वी झाली?

वास्तविक, ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांना बैठकीसाठी बोलावले होते. 15 कनिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, बैठकीच्या थेट प्रक्षेपणावर राज्य सरकारने बंदी घातली होती. यामुळे ज्युनिअर डॉक्टर बैठकीच्या ठिकाणी पोहोचले मात्र आत गेले नाहीत. ममता बॅनर्जी 2 तास तिथे थांबल्या. थेट प्रक्षेपणाशिवाय बैठक घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news