Kolkata Gangrape | कोलकाता पुन्हा हादरलं! लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर गँगरेप, कर्मचाऱ्यांसह दोघांना अटक

कोलकाता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरलं
Kolkata Gangrape
Kolkata Gangrape(file photo)
Published on
Updated on

Kolkata Gangrape Case

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता पुन्हा एकदा एका सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार प्रकरणानंतर आता कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

२५ जूनच्या रात्री कोलकातातील एका लॉ कॉलेजच्या आवारात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यात दोन विद्यार्थी आणि संस्थेच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. सदर कर्मचारी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून सध्या तो तृणमूल काँग्रेसचा विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याचे समजते.

Kolkata Gangrape
Online job scams | ऑनलाईन गंडा! चुकूनही क्लिक करु नका 'या' लिंकवर, नाहीतर बॅँक खाते होईल रिकामे

मनोजित मिश्रा (३१), जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखोपाध्याय उर्फ ​​प्रमित मुखर्जी (२०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली. २५ जून रोजी संध्याकाळी ७:३० ते १०:५० दरम्यान कॉलेजच्या आवारात ही घटना घडल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पीडित विद्यार्थिनीची कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज (CNMC) येथे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. संशयित आरोपी मनोजित आणि जैब याला २६ जून रोजीच्या संध्याकाळी तालबागन क्रॉसिंग येथील सिद्धार्थ शंकर शिशू रॉय उद्यानाजवळ अटक केली. दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तिसरा संशयित प्रमितला २७ जून रोजी त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याचाही फोनही जप्त करण्यात आला. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

Kolkata Gangrape
Pune Crime | तिहेरी हत्याकांडाचा उलगडा! हातावरील एक टॅटू ठरला तपासाचा धागा

महिला आयोगाकडून घटनेची दखल

तिघा संशयित आरोपींना गुरुवारी दक्षिण २४ परगणा येथील अलीपूर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांना सखोल करण्यास सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news