

Kiran Bedi On BJP: भारताच्या पहिल्या महिला आयपीएल आणि पाँडेचेरीच्या माजी उपराज्यपाल किरण बेदी यांनी कानपूरमध्ये एक मोठं वक्तव्य केलं. कानपूरमधील रोटेरियन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं.
किरण बेदी यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची चूक त्या पुन्हा करणार नाहीत. तसेच कॉक्रोज जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या आदोलनाबाबत विचारले अशते त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. त्यांनी मी या लोकांना फॉलो करत नाही त्यामुळं मला यांच्याबाबत कमेंट करायची नाही असं त्या म्हणाल्या.
कार्याक्रमावेळी किरण बेदी यांनी कानपूरमधील हवाई सेवेची स्तुती केली आहे. त्यांनी यापूर्वी लखनौमधून फक्त खराब रस्त्यांनी यावं लागत होतं. आता दिल्लीतून कानपूरचा प्रवास चांगला झाला. थेट फ्लाईट आरामदायी होती. सायबर क्राईम बाबत देखील किरण बेदी यांनी शिक्षण हाच या गुन्ह्यांना थांबवण्याचा चांगला मार्ग आहे.
आयुष्याच्या या टप्प्यावर देखील देशाच्या विकासासाठी आपण काय योगदान देणार असं विचारलं असता बेदी यांनी ७७ व्या वाढदिवसादिवशी भारत स्कील एक्सचेंज स्टार्टअप केलं आहे. तरूणांसाठी स्कील डेव्हलपमेंट गरजेचं आहे. यासाठी त्यांनी काम करण्याचं ठरवलं आहे.
यापूर्वी किरण बेदी यांनी दिल्ली जिमखाना क्लबला खाली करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय ऐकून तुम्हाला घरातून बेदखल केलं जात आहे असं वाटतंय. त्यांनी आठवणींना उजाळा देण्याबाबत वक्तव्य केलं. त्यांनी ती अशी जागा आहे जिथं मी १४ वर्षापासून खेळत वाढले आहे.
मी अमृतसरपासून दिल्लीला टेनिस खेळण्यासाठी येत होते. यावेळी दिल्लीवर माझं प्रेम जडलं. एक दिवस मी इथं या शहरात काम करणार असं स्वप्न मी पाहिलं होतं. २४ व्या वर्षी माझी पहिली पोस्टिंग दिल्लीत झाली होती. त्यावेळी हा क्लब माझ्याच अख्त्यारित येत होता. क्लबचे वातावरण कायमच गर्व करावं असं होतं.