Kidney Surgery : किडनीचे पहिल्यांदाच शरीराच्या अन्य भागात यशस्वी प्रत्यारोपण

देशातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा 'एम्स'कडून दावा
Kidney Surgery
एका लहानग्याची खराब झालेली किडनी पोटाच्या खालच्या भागात प्रत्यारोपित करण्याची आव्हानात्मक शस्त्रक्रिया दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली | Kidney Surgery : एका लहानग्याची खराब झालेली किडनी पोटाच्या खालच्या भागात प्रत्यारोपित करण्याची आव्हानात्मक शस्त्रक्रिया दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. देशातील ही अशा स्वरूपाची पहिली, तर जगातील तिसरी शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

Kidney Surgery
Baba Vanga-Donald Trump | 'ट्रम्प यांच्यावर हल्ला ! बाबा वेंगांचे भाकीत ठरले खरे

रेनोव्हास्कुलर हायपरटेन्शन नावाच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या सात वर्षांच्या मुलावर ऑटोट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया २९ जून रोजी करण्यात आली. तब्बल आठ तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी आपले सारे वैद्यकीय कौशल्य पणाला लावले. शस्त्रक्रियेनंतर प्रणिल चौधरी नावाच्या मुलाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, त्याची तब्येत ठणठणीत आहे. स्टेंट आणि शस्त्रक्रिया हे दोनच पर्याय रेनोव्हास्कुलर हायपरटेन्शन नावाच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या सात वर्षांच्या मुलावर ऑटोट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया २९ जून रोजी करण्यात आली.

Kidney Surgery
Jammu and Kashmir | मोठ्या कारवाईचे संकेत! राजनाथ सिंह यांची आर्मी प्रमुखांशी चर्चा

तब्बल आठ तास चालली शस्त्रक्रिया

तब्बल आठ तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी आपले सारे वैद्यकीय कौशल्य पणाला लावले. शस्त्रक्रियेनंतर प्रणिल चौधरी नावाच्या मुलाला रुग्णालयातून घरी गेल्या तीन वर्षांत तीनदा रक्तस्राव झाल्यानंतर पालकांनी प्रणिलला दोन खासगी रुग्णालयांत नेले होते. तेथील डॉक्टरांनी मुलाची किडनी काढण्याचा सल्ला दिला. यानंतर पालकांनी मुलाला एम्सच्या सीटीबीएस विभागात नेले. डॉक्टरांकडे उपचाराचे दोन पर्याय होते. पहिला म्हणजे स्टेंट आणि दुसरा पर्याय होता शस्त्रक्रियेचा. मुलाची तब्येत पाहता स्टेंट लावणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढून डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. (Kidney Surgery)

Kidney Surgery
Jammu and Kashmir | मोठ्या कारवाईचे संकेत! राजनाथ सिंह यांची आर्मी प्रमुखांशी चर्चा

एम्सच्या जनरल सर्जरी विभागाचे प्राध्यापक डॉ. मंजुनाथ पोळ यांनी सांगितले की, सात वर्षीय प्रणिलच्या उजव्या किडनीतील धमनीमध्ये विकार असल्यामुळे ती फुग्यासारखी फुगली होती. ती कधीही फुटू शकली असती. हे मुलासाठी अत्यंत धोकादायक होते. हा विकार शरीराच्या इतर भागांवर परिणाम करू शकतो. यामुळे ब्रेन स्ट्रोक येण्याचीही शक्यता असते. काही मुलांमध्ये हा आजार जन्मजात असतो, तर काही मुलांमध्ये हा आजार वयाच्या पाच, सात किंवा तेराव्या वर्षी दिसून येतो. या आजारात रक्तभिसरण प्रभावित होऊन रक्तदाब वाढतो.

Kidney Surgery
प्राजक्ता माळीचे हटके फोटो

... तर तीस सेकंदांत दीड लिटर रक्तस्त्राव

मुलाचे वजन केवळ २१ किलो होते आणि धमनीमधील विकार किडनीच्या अगदी जवळ होता, ही प्रमुख अडचण होती. त्यामुळे किडनी सुरक्षितपणे नसांपासून वेगळी करणे हे फार मोठे आव्हान होते. अपघाताने मोठी नस कापली गेली असती, तर २०-३० सेकंदांत एक ते दीड लिटर रक्तस्राव झाला असता. यामुळेच खराब झालेली रक्तवाहिनी अतिशय काळजीपूर्वक काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news