Murder Case : नात्याला काळीमा! स्वतःसाठी ‘आयफोन’ अन् प्रियकरासाठी दुचाकी.. नातीनेच केली आजोबांची हत्या

आजोबांच्या हत्येचा व्हिडिओ सापडला नातीच्या मोबाईलमध्ये, केरळच्या अलप्पुझामधील सुन्न करणारी घटना
Kerala Murder Case
Published on
Updated on

तिरुवनंतपुरम : केरळमधील अलप्पुझा येथे रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. एका ६५ वर्षीय वृद्धाच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावताना, त्यांच्या अल्पवयीन नातीनेच मित्रांच्या मदतीने स्वतःच्या आजोबांची निर्घृण हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन नातीसह तिच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्या प्रकरणात संबंधित तरुणीसह एकूण चार अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व अल्पवयीन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे प्रकरण बाल न्याय कायद्याच्या तरतुदींनुसार हाताळले जात आहे.

Kerala Murder Case
Siwan AK-47 Firing Case : सीवान विद्यार्थी आंदोलनादरम्यान AK-47 वापराप्रकरणी अधिकार्‍याची पोलीस अधीक्षक पदावरुन हकालपट्टी

प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, स्वतःसाठी महागडा 'आयफोन' आणि प्रियकरासाठी दुचाकी खरेदी करण्याची तरुणीची तीव्र इच्छा होती. याच हव्यासापोटी तिने आपल्या आजोबांच्या हत्येची सुपारी मित्रांना दिली होती. आजोबांची हत्या घडवून आणल्यानंतर संशयित तरुणीने घरातील सोन्याची नाणीही लंपास केली होती.

आजोबा घरात एकटे असतानाच रचला हत्येचा कट

आजोबा घरात पूर्णपणे एकटे असल्याची संधी साधून तीन अल्पवयीन साथीदारांनी ही रक्तरंजित घटना प्रत्यक्ष घडवून आणली. धक्कादायक बाब म्हणजे, आजोबांचा जीव घेत असतानाचे क्रूर चित्रण (व्हिडिओ रेकॉर्डिंग) करून आरोपींनी ते त्या तरुणीला पाठवले होते. यावरून या हत्येचा संपूर्ण कट अत्यंत थंड डोक्याने आणि पूर्वनियोजित पद्धतीने आखण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Kerala Murder Case
Supreme Court : फाशीद्वारे शिक्षेची पद्धत रद्द होणार नाही! याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने केंद्राला कोणते निर्देश दिले?

गळा आवळून संपवले जीवन

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा मृत वृद्धाचे हात आणि पाय कापडाच्या साहाय्याने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी त्यांना शेवटचे शनिवारी संध्याकाळी पाहिले होते. दरम्यान, एका नातेवाइकाच्या घरी वास्तव्यास असलेली नात सोमवारी सकाळी भाड्याच्या घरी परतली. त्यावेळी 'घराचा दरवाजा कोणीही उघडत नाहीये' असा बनाव तिने शेजाऱ्यांसमोर केला. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता वृद्धाचा मृतदेह आढळून आला आणि तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Kerala Murder Case
Diageo Whisky Rum formula change: तुमच्या आवडत्या व्हिस्की आणि रमची चव बदलणार; 'हे' लोकप्रिय ब्रँड्स फॉर्मुल्यात करणार बदल

असा फुटला अल्पवयीन नातीचा भांडाफोड

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणी केली असता, वृद्धाच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळून आले; ज्यावरून त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय बळावला. घरात झडती घेतली असता घरातील ६ सोन्याची नाणीही गायब असल्याचे समोर आले.

घटनास्थळावरील तपासादरम्यान तरुणीच्या वर्तनामुळे पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला. घरात इतकी मोठी घटना घडलेली असतानाही तरुणी शाळेतील सत्र परीक्षेला बसण्यासाठी अवास्तव आग्रह धरत होती. तिच्या या संशयास्पद वागणुकीमुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. पोलिसांनी तिच्या मोबाईलची न्यायवैद्यक तपासणी केली असता, तिच्या अल्पवयीन मित्रांच्या टोळक्याने आजोबांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ फुटेज तिच्यासोबत शेअर केल्याचे स्पष्ट झाले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा छडा लावून आरोपींना गजाआड केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news