केजरीवालांच्या वैद्यकीय तपासणीवेळी पत्नीला परवानगी नाकारली

दिल्ली न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Delhi liquor policy case
दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सीबीआयने न्‍यायालयात हजर केले. File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैद्यकीय तपासणीच्या वेळी त्यांच्या पत्नीला उपस्थित राहता येणार नाही, असे राऊस अव्हेन्यू न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एक झटका बसला आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल तेव्हा त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका केजरीवाल यांनी दाखल केली होती.

केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सांगितले की, "तुरुंगाच्या नियमांच्या विरोधात जाऊन अरविंद केजरीवाल यांना तशी सुविधा देण्याचे कोणतेही कारण नाही.

अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या तुरुंगातील इतर अनेक कैद्यांवरही आजारावर उपचार सुरू आहेत. आणि त्यापैकी कोणालाही सहकारी ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही." त्यामुळे सुनिता केजरीवाल अरविंद केजरीवाल यांच्या वैद्यकीय तपासणी वेळी उपस्थित राहू शकणार नाहीत.

मात्र, न्यायालयाने सुनीता केजरीवाल यांना वैद्यकीय मंडळाला भेटण्याची परवानगी दिली आहे. तसेच केजरीवाल यांचे सर्व वैद्यकीय अहवाल सुनीता केजरीवाल यांना देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news