वैद्यकीय तपासणीवेळी पत्नीच्या उपस्थितीची केजरीवालांची मागणी

वैद्यकीय तपासणीवेळी पत्नीच्या उपस्थितीची केजरीवालांची मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात वैद्यकीय चाचणीसंदर्भात याचिका दाखल केली आहे. वैद्यकीय चाचणीदरम्यान पत्नी सुनीता केजरीवाल यांना व्हिडीओ प्रणालीद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि.15) सुनावणी होणार आहे.

केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत (दि.19) जून रोजी संपणार आहे. दरम्यान न्यायालयाने 5 जून दिवशी तुरुंग अधिकाऱ्यांना केजरीवाल यांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी केजरीवाल यांचा वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन न्यायालयाकडून नाकारण्यात आला आहे.

विभव कुमारच्या जामीन प्रकरणी 'आप'ला दिलासा

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.14) दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. विभवकुमारच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अमित शर्मा यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल दिल्ली पोलिसांकडून मागवला आहे. याबरोबरच विभव कुमारच्या जामीन याचिकेला दिल्ली पोलिसांनी विरोध केला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news