केजरीवालांना जामीन मंजूर, शरद पवारांचे ट्वीट,  "नामोहरम करण्याचा कट..."

सर्वोच्च न्यायालयाने जामिनानंतर घातल्या अटी
Arvind Kejriwal
 केजरीवालांना जामीन मंजूर, शरद पवारांचे ट्वीट,  "नामोहरम करण्याचा कट..."Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Supreme Court Verdict) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (दि. १३ सप्टेंबर) जामीन मंजूर केला. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी ट्वीट करत, देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम असल्याचे म्हटले आहे.

एखाद्याला नामोहरम करण्याचा कट...

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ट्वीट करत म्हटले आहे. "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली."

काय आहे प्रकरण? 

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१३) सशर्त जामीन मंजूर केला. यामुळे केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी त्यांना ईडी खटल्यातही जामीन मंजूर झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना त्यांना काही अटी घातल्या आहेत. त्यांनी या खटल्याबद्दल कोणतेही सार्वजनिकरित्या भाष्य करु नये आणि जोपर्यंत सूट दिली जात नाही तोपर्यंत त्यांना ट्रायल न्यायालयासमोरील सर्व सुनावणींना हजर राहावे लागेल, या अटींवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news