Karegutta Hill: कोंम्बिग ऑपरेशनदरम्यान घात झाला, नक्षलवादी हल्ल्यात पाच जवान शहीद

Karegutta Hill Anti Maoist: गडचिरोलीपासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असलेली आणि छत्तीसगड- तेलंगण सीमेवरील करेगुट्टा पर्वतरांग हा नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान.
Chhattisgarh Naxal Attack Karegutta Hill Operation
Chhattisgarh Naxal Attack Karegutta Hill OperationPudhari
Published on
Updated on

Karegutta Hill Anti Naxal Operation 5 security personnel killed

गडचिरोली : छत्तीसगड- तेलंगण सीमेवरील करेगुट्टा येथील नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान पाच जवान शहीद झाले. वाझेड येथे नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला आणि यात पाच जवान शहीद झाले. यानंतर सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली असून या चकमकीत ८ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे.

गडचिरोलीपासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असलेली आणि छत्तीसगड- तेलंगण सीमेवरील करेगुट्टा पर्वतरांग म्हणजे नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान. 21 एप्रिलपासून सुरक्षा दलांनी नक्षलींचे हे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

Chhattisgarh Naxal Attack Karegutta Hill Operation
Operation Sindoor: हा घ्या पुरावा! हल्ल्यापूर्वी आणि नंतर... Satellite फोटो समोर, पाकिस्तानची नाचक्की

गुरुवारी वाझेड- व्यंकटपूरम या भागात तेलंगण पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान यांचे पथक कोम्बिंग ऑपरेशन राबवत होते. यादरम्यान नक्षलींनी आयईडी स्फोट घडवला. त्यानंतर सुरक्षा दलांवर गोळीबार देखील करण्यात आला. यात आठ जवान जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी हैदराबाद आणि वारंगल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील पाच जवानांचा उपचारादरम्यान निधन झाले.

आठ नक्षलवाद्यांचा खात्मा

हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आठ नक्षलींचा खात्मा केला. या चकमकीत सीसी सदस्य चंद्राणा आणि एसझेडसीएम बंदी प्रकाश यांच्यासह एकूण 8 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सुरक्षा दलातील सूत्रांनी 'पुढारी न्यूज'ला ही माहिती दिली.

सुरक्षा दलांनी मोहीम राबवल्यानंतर नक्षलवाद्यांनी करेगुट्टा पर्वतरांगेत ठिकठिकाणी आयईडी लावले आहेत. त्यामुळे आदिवासींनी पर्वतरांगा परिसरात येऊ नये, असा धमकीवजा इशाराच नक्षलवाद्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आयईडी स्फोटांमध्ये स्थानिक ग्रामस्थही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे.

Chhattisgarh Naxal Attack Karegutta Hill Operation
Operation Sindoor | ‘राफेल’चा रुद्रावतार

‘करेगुट्टा’मध्ये नक्षलींची सर्वात हिंसक बटालियन?

करेगुट्टा टेकडीवर नक्षलवाद्यांची बटालियन क्रमांक १ ही लपून बसल्याचा दावा केला जात आहे.  या बटालियनने गेल्या १५ वर्षांमध्ये सुरक्षा दलातील १५० पेक्षा जास्त जवानांचा बळी घेतल्याचे सांगितले जाते. मोस्ट वाँटेड माडवी हिडमा हा या बटालियनचा प्रमुख असल्याचे समजते. याशिवाय देवा, दामोदर हे नक्षलवाद्यांचे टॉप लीडरही याच पर्वतरांगेत लपून बसल्याचा दावा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news