HC on Social Media : 'सोशल मीडियावर अशा प्रकारे ..'; डेअरी उत्पादनांवर भाष्य करणाऱ्या डॉक्टरला हायकोर्टाने सुनावले खडे बोल!

फौजदारी कारवाईला स्थगिती देण्यास नकार
Court News
Court NewsPudhari
Published on
Updated on

Social Media Misinformation Court Ruling : इन्स्टाग्राम रील्सच्या (Instagram Reels) माध्यमातून एका डेअरी उत्पादनांबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप असलेल्या बेंगळुरू येथील महिला डॉक्टरविरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने आज (दि.२२) नकार दिला.

प्रकरण काय?

'बार अँड बेंच'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, कर्नाटक मिल्क फेडरेशन (KMF) ने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. शरण्या पद्मा यांनी इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स अपलोड करून 'नंदिनी'ची काही दूध उत्पादने पिण्यासाठी असुरक्षित असल्याचा बदनामीकारक दावा केला होता. स्ट्रॉबेरी-फ्लेवर्ड दूध आणि इतर तत्सम पेये विषारी असून त्यात रसायने असल्याचा दावा केला होता, ज्यामुळे आरोग्याविषयी समस्या उद्भवू शकतात असे म्हटले होते.

Court News
Controversy : प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमधील विधानावरून गदारोळ! महिलांवर अश्लील टीप्पणी करणा-या तरुणाची नोकरीमधून हकालपट्टी

डॉ. पद्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या तक्रारीवरून मल्लेश्वरम पोलिसांनी डॉ. पद्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. डॉ. पद्मा बेंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असून कोलार जिल्ह्यातील मालूर येथे स्वतःचे क्लिनिकही चालवतात. हा गुन्हा रद्द करण्यासाठी डॉ. पद्मा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Court News
Delhi HC verdict : भांडणावेळी 'मारो साले को' म्हणणं म्हणजे हत्येचा हेतू नव्हे: हायकोर्ट

सोशल मीडिया घबराट निर्माण करण्यासाठी नाही : उच्‍च न्‍यायालय

"वैज्ञानिक आधार नसताना जनतेमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाऊ शकत नाही," असे न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी स्पष्ट केले. तसेच, आरोपी डॉक्टरने तिच्याविरुद्धचा फौजदारी खटला रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर कोणताही अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला.या याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकार आणि 'कर्नाटक मिल्क फेडरेशन' (KMF) कडून उत्तर मागवले आहे. KMF नेच या डॉक्टरविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

Court News
Supreme Court|गुण प्रसिद्ध झाले नाहीत म्हणजे 'पास' नव्हे : भरती प्रक्रियेतील उमेदवाराबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

न्यायालयाने सुनावले खडे बोल

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान डॉक्टरच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, त्यांनी केवळ स्ट्रॉबेरी-फ्लेवर्ड उत्पादनांवर टिप्पणी केली होती आणि नंदिनीच्या मूळ दुधाबद्दल कोणतेही वक्तव्य केले नव्हते. या युक्तिवादावर न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. "तुम्ही असे कसे बोलू शकता? तुम्ही सर्व नागरिकांमध्ये घबराट निर्माण करत आथ. नंदिनीचे दूध चांगले नाही असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? तुम्ही त्याची तपासणी केली आहे का? तुम्ही प्रमाणित आहात का? तुम्ही याबद्दल सरकारशी काही संपर्क साधला होता का? इन्स्टाग्राम यासाठीच आहे का?" असा संतप्त सवाल न्यायालयाने केला.

Court News
Aadhaar privacy case | "...तर 'आधार'ची माहिती उघड केली जाऊ शकते" : हायकोर्टाने नक्की कोणता आदेश दिला?

इन्स्टाग्राम या गोष्टींसाठी नाही....

"'भेसळयुक्त दूध' म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुम्ही अशी घबराट निर्माण करू शकत नाही. दूध भेसळयुक्त आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर चांगला नाही असे सांगणे - जर ते चांगले नसेल, तर तुम्ही ते पिऊ नका. तुम्हाला हे सर्व करण्याची काय गरज आहे? कोणी ते चाचणीसाठी पाठवले होते का?"सोशल मीडियावर अशा प्रकारे विधाने प्रसारित होण्याबद्दल चिंता व्यक्त करत न्यायाधीशांनी टिप्पणी केली की, "काहीही कारण नसताना अगदी सहजासहजी तुम्ही अशी विधाने करता आणि समाजात समस्या निर्माण करता. इन्स्टाग्राम या गोष्टींसाठी नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news