इडली प्रेमींनो, सावधान ! 'हा' पदार्थ बनवताना प्लास्टिक वापरल्याने होऊ शकतो कॅन्सर

Karnataka idli News| कर्नाटक सरकारची धक्कादायक माहिती, प्लास्टिक वापरावर बंदी
Karnataka idli News
Idli |इडली प्रेमींनो, सावधान ! 'हा' पदार्थ बनवताना प्लास्टिक वापरल्याने होऊ शकतो कॅन्सर File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: Karnataka idli News | इडली प्रेमींसाठी ही धक्कादायक माहिती आहे. कारण कर्नाटकमधील काही हॉटेल्समध्ये इडली बनवताना वारण्यात येणारे प्लास्टिक आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे सरकारच्या अहवालात म्हटले आहे. हे प्लास्टिक कर्करोगाला आमंत्रण देत असल्याचे म्हणत सरकारने राज्यांतील प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध घातले आहेत. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.

पारंपारिक कापडाऐवजी होतोय प्लास्टिक वापर

सरकारने राज्यातील ५२ हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी पॉलिथीन पेपर वापरल्याचे आढळून आले. त्यानंतर कर्नाटक सरकारने कडक पाऊल उचलत इडली बनवण्यासाठी प्लास्टिक पेपर वापरावर बंदी घातली असल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. त्यांच्यामते, आरोग्य विभागाने राज्यभरातून इडलीच्या सुमारे २५० वेगवेगळ्या नमुन्यांची चाचणी केली असता, पारंपारिक कापडाऐवजी इडली झाकण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला गेला असल्याचे निदर्शनास आले.

२५१ पैकी ५२ नमुन्यांमध्ये प्लास्टिकचा वापर

"विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यभरातून २५१ नमुने गोळा केले आणि ते चाचणीसाठी पाठवले. पूर्वी इडली बनवताना कापडाचा वापर केला जात होता; आजकाल काही ठिकाणी कापडाऐवजी प्लास्टिकचा वापर केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली." म्हणूनच, आमच्या विभागाने याची तपासणी केली असता २५१ पैकी ५२ नमुन्यांमध्ये प्लास्टिक पेपरचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. प्लास्टिकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक असतात आणि ते इडलीमध्ये जाऊ शकतात म्हणून हे करू नये,” असे आरोग्यमंत्री गुंडू राव यांनी स्पष्ट केले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

आरोग्य विभाग लवकरच असे होऊ नये यासाठी अधिकृत आदेश जारी करेल. आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा प्लास्टिक कागद वापरणाऱ्या कोणत्याही आस्थापनांवर आवश्यक कारवाई करेल, असे देखील कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

मंचुरियन, गोल गप्यांवरही कर्नाटकात बंदी

यापूर्वी, कर्नाटकच्या अन्न विभागाने गोल गप्पांच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) राज्यातील २६० ठिकाणांहून पाणीपुरीचे नमुने गोळा केले, त्यापैकी ४१ नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आणि कर्करोगजन्य पदार्थ आढळून आले. याशिवाय, अन्न विभागाने गोबी मंचुरियन आणि इतर फास्ट फूडवर कारवाई केली होती आणि त्यात रसायने आणि कृत्रिम रंगांचा वापर केल्याने कर्करोग होऊ शकतो असे म्हटले होते. अहवाल आल्यानंतर सरकारने रोडामाइन-बी नावाच्या खाद्य रंगावर बंदी घातली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news