

पुढारी ऑनलाईन डेस्क: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौत या आघाडीवर आहेत. त्या 1294 मतांनी आघाडीवर आहेत. विक्रमादित्य सिंह हे येथून काँग्रेसचे उमेदवार आहेत. विक्रमादित्य हे मंडीतील काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांचे पुत्र आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपचे राम स्वरूप शर्मा विजयी झाले होते.
चित्रपट आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. बॉलीवूडपासून दक्षिणेपर्यंत असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये आपला अभिनय कौशल्य सिद्ध केल्यानंतर आपले नशीब आजमावण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. अनेक सिनेतारकांना त्यांच्या प्रवासात लोकांचे प्रेमही मिळाले. यावेळीही अनेक तारे निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत.