पुढारी ऑनलाईन डेस्क: भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के कविता यांची दिल्ली अबकारी धोरण प्रकरणातील जामीन अर्जावरील सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज झालेल्या सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला आहे.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान के.कविता यांच्या वकिलाने युक्तिवादासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात के.कविता यांनी नियमित जामीन मागितला आहे.