हरियाणातील 'जिलेबी' राहुल गांधींसाठी 'कडवट'च !

Jalebi is trending | जाणून घ्या #जिलेबी ट्रेंड का होतोय व्हायरल?
 Haryana election 2024
हरियाणा विधानसभा प्रचारादरम्यान राजकीय वतुळातील #जिलेबी हा विषय चांगलाच रंगला. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या'#जिलेबी' ट्रेनिंग आहे. 'X' Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: हरियाणात विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज (दि.१०) सुरू आहे. दरम्यान दुपारपर्यंत काही मतदारसंघातील निकाल स्पष्ट झालेत, अद्याप काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. हरियाणात भारतीय जनता पार्टी निर्णायक आघाडी घेताना दिसत आहे. तर काँग्रेस पिछाडीवर पडली आहे. हरियाणा विधानसभा प्रचारादरम्यान राजकीय वतुळातील #जिलेबी हा विषय चांगलाच रंगला. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या'#जिलेबी' ट्रेनिंग आहे.

प्रचारादरम्यान हरियाणातील #जिलेबीचे कौतुक 

काही दिवसांपूर्वी हरियाणातील प्रचार सभेदरम्यान राहुल गांधी यांनी येथील जिलेबी टेस्ट केली होती. राहुल यांना ही जिलेबी खूप आवडी होती. त्यानंतर त्यानी आत्तापर्यंतच्या खाल्लेल्या जिलेबीमधील "सर्वोत्तम जिलेबी" असे म्हणत कौतुक केले होते. त्यानंतर राहुल यांनी बहिण प्रियंका गांधी यांना देखील तुझ्यासाठी खास जिलेबी घेऊन येत असल्याचा मेसेज केला होता.

राहुल गांधींची #जिलेबी PM मोदींवर टीका

राहुल गांधी यांनी हरियाणातील जिलेबी भारत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी कारखान्यात, औद्योगिक स्तरावर जिलेबी तयार करणे आवश्यक आहे, असे म्हणत उद्योगपती अदानी, अंबांनीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली होती. या घटनेनंतर हरियाणा विधानसभेच्या राजकीय वर्तुळात #जिलेबी हा विषय कळीचा मुद्दा ठरला.

'जिलेबी तेरा, हरियाणा मेरा'; ट्रेंड होतोय प्रचंड व्हायरल

राहुल गांधी यांना आवडलेली जिलेबी ही हरियाणातील गोहाना शहरातील लाला मातुराम हलवाई यांच्या लोकप्रिय दुकानातील होती. सध्या हरियाणा विधानसभेचा एकएक मतदारसंघातील निकाल हाती येत असून, भाजपची बहुमतासह विजयी वाटचाल सुरू आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. दरम्यान, आता राहुल गांधी यांच्या भाषणातील जिलेबीच्या मुद्द्यावरून 'जिलेबी तेरा, हरियाणा मेरा' असा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news