

JEE Main 2026 Final Answer Key
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जेईई मेन सत्र २ ची अंतिम उत्तरसूची (Final Answer Key) प्रसिद्ध केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये आयोजित सत्र २ च्या परीक्षेस बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन ही उत्तरतालिका डाऊनलोड करू शकतात.
तात्पुरत्या उउत्तरसूची नोंदवण्यात आलेल्या सर्व हरकतींची समीक्षा केल्यानंतर, गुणांची अंतिम गणना करण्यासाठी ही उत्तरसूची वापरली जाते, त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची आहे. या अंतिम उत्तरसूचीद्वारे काही प्रश्न वगळण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सत्रात एकूण २ प्रश्न वगळण्यात आले आहेत. ज्या शिफ्टमधील प्रश्न वगळले गेले आहेत, त्या शिफ्टमधील उमेदवारांना बोनस गुण दिले जातील.
NTA ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, जेईई मेन २०२६ सत्र २ चा निकाल आज म्हणजेच २० एप्रिल रोजी घोषित केला जाईल. निकालाची नेमकी वेळ अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यामुळे आता निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.
उमेदवार खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून आपला निकाल पाहू आणि डाऊनलोड करू शकतात:
सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
“Candidate Activity” या विभागात असलेल्या JEE Main 2026 Session 2 Result या लिंकवर क्लिक करा.
तुमचा अर्ज क्रमांक (Application Number) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
तुमचे स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून ठेवा.