JEE Advanced 2025 result | जेईई ॲडव्हान्स्ड २०२५ चा निकाल जाहीर, रजित गुप्ता ऑल इंडिया टॉपर, एका क्लिकवर पाहा तुमचा निकाल

जेईई ॲडव्हान्स्ड २०२५ परीक्षा CBT स्वरूपात घेण्यात आली होती
JEE Advanced 2025 result
JEE Advanced 2025 result
Published on
Updated on

JEE Advanced 2025 result

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरने सोमवारी (दि.२ जून) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) ॲडव्हान्स्ड २०२५ चा निकाल अधिकृतपणे जाहीर केला. यात आयआयटी दिल्ली झोनमधील रजित गुप्ता अखिल ऑल इंडिया टॉपर ठरला. त्याने ३६० पैकी ३३२ गुणांसह AIR १ मिळवला आहे.

जेईई ॲडव्हान्स्ड २०२५ मध्ये ऑल इंडिया रँक १ मिळवलेला रजित गुप्ता हा कोटा येथील महावीर नगर येथील रहिवाशी आहे. त्याने यापूर्वी जेईई मेन (एप्रिल सत्र) मध्ये एअर १६ मिळवला होता. तर जानेवारीमधील सत्रात १०० टक्के पर्सेंटाईल मिळवले होते.

ही परीक्षा दिलेले उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड आणि फायनल उत्तरसूची (answer keys) jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. जेईई ॲडव्हान्स्ड २०२५ ही परीक्षा १८ मे रोजी संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. उमेदवारांना स्कोअरकार्ड पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर नमूद करावा लागेल.

JEE Advanced 2025 result
Pharmaceutical Career : औषधनिर्मिती क्षेत्रातील शोधा करिअर संधी!

यंदाच्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत तीव्र स्पर्धा दिसून आली. पेपर १ आणि पेपर २ या दोन्हीमधील गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील एकूण गुणांच्या आधारे रँक निश्चित करण्यात आली. आयआयटी प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा जेईई अॅडव्हान्स्ड २०२५ परीक्षा १.८ लाखांहून अधिक उमेदवारांनी दिली होती.

ऑल इंडिया टॉप १०

रजित गुप्ता - AIR 1

सक्षम जिंदाल- AIR 2

माजिद मुजाहिद हुसेन- AIR 3

पार्थ मंदार वर्तक- AIR 4

उज्ज्वल केसरी- AIR 5

अक्षत कुमार चौरसिया- AIR 6

साहिल मुकेश देव- AIR 7

देवेश पंकज भैया- AIR 8

अर्णव सिंग - AIR 9

वदलामुडी लोकेश- AIR 10

JEE Advanced 2025 result
Career Management : असे निवडा व्यवस्थापनात करिअर

जेईई ॲडव्हान्स्ड २०२५ चे स्कोअरकार्ड असे करा डाउनलोड

jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

JEE Advanced 2025 Result च्या लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख नमूद करून लॉग इन करा.

तुमचे स्कोअरकार्ड पाहा आणि डाउनलोड करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news