Pandit Jawaharlal Nehru : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन!

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांनी समाधीस्थळी जाऊन वाहिली पुष्पाजंली
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जून खरगे यांनी समाधीस्थळी जाऊन वाहिली पुष्पाजंली
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जून खरगे यांनी समाधीस्थळी जाऊन वाहिली पुष्पाजंली
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अशोक गेहलोत यांनी ‘शांतीवन’ या जवाहरलाल नेहरूंच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासह दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव आणि इतर नेते उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, जयराम रमेश यांनी संसदेतील संविधान सदनात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या.

समाज माध्यमांवर पंडित नेहरूंना अभिवादन करत राहुल गांधी म्हणाले की, स्वातंत्र्य हे त्यांचे ध्येय नव्हते, तर देशाच्या नव्या प्रवासाचे ते अंतिम ध्येय होते. स्वराज्य म्हणजे सत्ता नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि देशाच्या भविष्याची जबाबदारी होती. त्यांच्यासाठी भारत हा एक शोध, एक कल्पना होती. विविधता ही तिची शक्ती, लोकशाही हा तिचा विश्वास आणि समानता हा तिचा पाया होता, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.