
Jammu Kashmir
जम्मू-काश्मीर : पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट परिसरात पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि साहित्य जप्त केले आहे.
सुरक्षा दलांकडून बेहरामगलाजवळील मारहा भागात ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी कारवायांना लक्ष्य करून ही शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, या अड्ड्यातून तीन हातबॉम्ब, गोळ्या, चार्ज लीड, लोखंडी रॉड, वायर कटर, चाकू, पेन्सिल सेल, लाईटर आणि इतर अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिसरातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ही शोध मोहीम राबवण्यात आली. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठे यश मिळाले असून परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली.