Jammu Kashmir Shopian terror surrender |
जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी गुरूवारी आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
शोपियानमधील बास्कुचन भागात सुरक्षा दलांनी बुधवारपासून कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान, लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन एके-५६ रायफल, ४ मॅगझिन, १०२ राउंड (७.६२x३९ मिमी), २ हँडग्रेनेड, २ पाउच इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.