

kulgam encounter
जम्मू-काश्मीर : कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर वनक्षेत्रात सोमवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर तीन जवान जखमी झाले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुप्त माहिती दिल्यानंतर लष्कराकडून ही कारवाई सुरू झाली, त्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त शोध मोहीम राबवली.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने 'एक्स' वरील पोस्टमध्ये सांगितले की, "सावध सैनिकांनी संशयास्पद हालचाल पाहिली आणि त्यांना आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जोरदार गोळीबार झाला. यात एक दहशतवादी ठार झाला असून एक अधिकारी जखमी झाले आहेत. अजूनही मोहीम सुरू आहे." सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपलेले असू शकतात. अतिरिक्त सैन्य दल तैनात करण्यात आले असून चकमक अजूनही सुरू आहे.