High Court on Abortion Ruling : न्यायालयीन आदेशाशिवाय गर्भपात करण्यास डॉक्टरांची टाळाटाळ; हायकोर्ट काय म्हणाले?

रुग्णालयाच्या अधीक्षकांना तातडीने वैद्यकीय मंडळ स्थापन करून तत्‍काळ निर्णय घेण्‍याचे निर्देश
Court Verdict
Court Verdict File Photo
Published on: 
Updated on: 

High Court on MTP Act abortion ruling : 'मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी' (MTP) कायद्यांतर्गत गर्भपात करण्यास कायदेशीर परवानगी असूनही डॉक्टर अशा प्रक्रिया करण्यास नकार देतात. यामुळे पीडित मातांना देवाच्या भरवशावर राहावे लागते; काहीसा दिलासा मिळण्याच्या आशेने, कायदेशीर निर्देशांसाठी न्यायालयाकडे जाण्याचा मानसिक त्रास आणि भार सहन करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय उरत नाही, असे निरीक्षण नुकतेच जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने नोंदवले.

गर्भात गंभीर दोष आढळल्‍यानंतर महिलेची हायकोर्टात धाव

न्यायमूर्ती मोहम्मद युसूफ वानी यांच्या एकलपीठाने एका प्रकरणात सुनावणीदरम्यान ही टिप्पणी केली. गर्भात गंभीर दोष (Foetal Abnormalities) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही डॉक्टरांनी न्यायालयीन आदेशाशिवाय गर्भपात करण्यास नकार दिल्याने संबंधित महिलेला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती.

Court Verdict
High Court: धर्मांतराचा आग्रह धरणे म्हणजे धार्मिक भावनांचा अपमान नव्हे: उच्च न्यायालय

कायद्यात स्पष्ट तरतूद असतानाही जबाबदारीतून पळवाट

न्यायमूर्ती मोहम्मद युसूफ वानी यांनी स्‍पष्‍ट केले, "एमटीपी कायदा आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतुदी असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, विशेषतः वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमधील डॉक्टरांनी, तातडीच्या प्रकरणांमध्ये आपली वैधानिक जबाबदारी टाळणे अत्यंत दुर्दैवी आहे. डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे पीडित महिलांना मानसिक त्रास सोसत न्यायालयात दाद मागावी लागते."

Court Verdict
High Court: केवळ हिंदू पद्धतीने विवाह केल्याने 'हिंदू' असल्याचे सिद्ध होत नाही: उच्च न्यायालय

३१ आठवड्यांच्या गर्भाच्या प्रकरणात न्यायालयाचे आदेश

एमटीपी कायद्यानुसार २४ आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी दिली जाते. मात्र, ३१ आठवड्यांच्या गर्भात गंभीर दोष असल्याचे आढळल्यानंतर डॉक्टरांनी न्यायालयाच्या मध्यस्थीशिवाय शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवली होती. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, कायद्यातील कलम ३ (२-बी) आणि कलम ५ (१) नुसार गर्भात गंभीर व्यंग असल्यास किंवा महिलेच्या जीवाला धोका असल्यास वेळेची (आठवड्यांची) अट लागू होत नाही. दरम्यान, न्यायालयाने ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात श्रीनगर येथील लाल्ला देद रुग्णालयाच्या अधीक्षकांना तातडीने वैद्यकीय मंडळ स्थापन करून संबंधित प्रकरणावर त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news