Shagun Parihar : मुस्लिमांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या ‘रणरागिणी’चा 521 मतांनी विजय!

किश्तवाडमध्ये शगुन परिहार यांची बाजी, नॅशनल कॉन्फरन्सचे सज्जाद किचलूंचा पराभव
jammu kashmir election result Shagun Parihar
शगुन परिहार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jammu Kashmir Election Result : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत अनेक जागांची चर्चा झाली. भाजपने मुस्लीम लोकसंख्या मोठी असणा-या किश्तवाड मतदारसंघातून शगुन परिहार (Shagun Parihar ) यांना उमेदवारी दिली होती. पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या शगुन यांनी रोमहर्षक विजय मिळवला असून त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार सज्जाद अहमद किचलू यांचा अवघ्या 521 मतांनी पराभव केला आहे.

शगुन यांना 29,053 तर सज्जाद अहमद यांना 28,532 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या फिरदौस अहमद यांना केवळ 997 मते मिळाली. अशाप्रकारे या मुस्लिमबहुल जागेवर निकराच्या लढतीत शगुन परिहार यांनी 521 मतांनी विजय मिळवत भाजपला ‘शगुन’ दिला आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपला जरी सत्ता मिळाली नसली तरी त्यांनी 90 जागांपैकी 25 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यातच जम्मू विभागातील किश्तवाड मतदारसंघातून भाजपच्या शगुन परिहार रोमहर्षक विजय मिळवला. दहशतवादी हल्ल्यात वडील आणि काका गमावलेल्या 29 वर्षीय शगुन यांनी अवघ्या 521 मतांनी भाजपचे कमळ फुलवले आहे. या विजयानंतर त्या म्हणाल्या की, ‘आम्ही या परिसरात समृद्धी आणि शांतता नांदावी यासाठी प्रयत्नशी असणार आहे.’

शगुन यांचे काका अनिल परिहार हे भाजपचे दिग्गज नेते होते. ते जम्मू-काश्मीर भाजपचे सचिव होते. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांची आणि शगुन यांचे वडील अजित परिहार यांची किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news