डोडामध्ये लष्कराचे कॅप्टन शहीद; ४ दहशतवादी ठार

Doda Encounter | सेजधर परिसरात खराब हवामानामुळे शोधमोहिमेत अडचणी
Jammu Kashmir Doda Encounter
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील असार भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कॅप्टन शहीद झाले. ANI Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी डोडा जिल्ह्यात ओप असार येथे सुरु असलेल्या चकमकीदरम्यान ४८ राष्ट्रीय रायफल्समधील भारतीय लष्करातील एक कॅप्टन शहीद झाले आहेत. येथे अद्यार चकमक सुरू आहेत, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाई दरम्यान ४ दहशतवादी ठार झाले. तर एक नागरिकही जखमी झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत एका हाय प्रोफाइल बैठक बोलावली असताना ही चकमक झाली आहे. (Doda Encounter)

दारूगोळा आणि रसद सामग्रीही जप्त 

डोडामधील असार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. गोळीबार होत असतानाही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला असून परिसरात रक्ताचे डाग आढळून आले आहेत. सुरक्षा दलांनी M4 रायफलसह दारूगोळा आणि रसद सामग्रीही जप्त केली आहे. तीन पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी शोध पथकाचे नेतृत्व करताना लष्कराचा एक अधिकारी जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. (Doda Encounter)

डोडामधील असार भागात  चकमक

डोडामधील असार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी (दि.१४) उधमपूरच्या रामनगर तहसीलमधील दुडू बसंतगडच्या डोंगराळ भागात चार दहशतवादी दिसून आले. ते आसरमार्गे सेओजधरमार्गे डोडा जिल्ह्याच्या दिशेने निघाले असताना सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. सेजधर भागात दहशतवादी दिसले, मात्र धुक्याचा फायदा घेत ते पळून गेले. या परिसरात खराब हवामानामुळे धुके पसरले होते. दोन फूट अंतरावरूनही दिसत नसल्याने सुरक्षा दलांना शोध मोहिमेत अडचणी येत आहेत.

Jammu Kashmir Doda Encounter
जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवाद विरोधात गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news